अ‍ॅपशहर

डोंबिवलीच्या विद्यार्थ्याची फरफट

जहाजावरील नऊ महिन्यांच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी साडेतीन लाख रुपये घेऊन डोंबिवलीतील एका मरीन इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला सुदानला पाठवले. प्रत्यक्षात त्याठिकाणी प्रशिक्षण मिळालेच नाही. भारतात परतलेल्या या युवकाला नंतर दुबईत पाठवण्याचे आश्वासन दिले गेले. तेही आश्वासन पूर्ण न करत विद्यार्थ्याची फसवणूक करणाऱ्या पश्चिम बंगालच्या सिल्व्होका असोसिएट्स प्रा. लि. कंपनीचे संचालक तसेच ठाण्यातील कंपनीचे अधिकारी, संचालक तसेच असोसिएट्स यांच्याविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Times 16 Oct 2017, 4:00 am
अगोदर सुदान पाठवले, नंतर दुबईचे आश्वासन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dombivali student cheated in the name of shipping training
डोंबिवलीच्या विद्यार्थ्याची फरफट


म. टा. वृत्तसेवा, ठाणे

जहाजावरील नऊ महिन्यांच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी साडेतीन लाख रुपये घेऊन डोंबिवलीतील एका मरीन इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला सुदानला पाठवले. प्रत्यक्षात त्याठिकाणी प्रशिक्षण मिळालेच नाही. भारतात परतलेल्या या युवकाला नंतर दुबईत पाठवण्याचे आश्वासन दिले गेले. तेही आश्वासन पूर्ण न करत विद्यार्थ्याची फसवणूक करणाऱ्या पश्चिम बंगालच्या सिल्व्होका असोसिएट्स प्रा. लि. कंपनीचे संचालक तसेच ठाण्यातील कंपनीचे अधिकारी, संचालक तसेच असोसिएट्स यांच्याविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीतील देसाई गावात राहणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने मरिन इंजिनीअरिंगमधून डिप्लोमा केला आहे. डिप्लोमाचे दुसऱ्या वर्षाचे शिक्षण त्याने स्कॉटलंडमध्ये घेतले असून त्याला मरिन इंजिनीअरिंगमध्ये पदवी घ्यायची आहे. मात्र ही पदवी घेण्यासाठी एखाद्या जहाजावर प्रात्यक्षिक प्रशिक्षण आवश्यक असल्याने तो ते देणाऱ्या कंपनीचा शोध घेत होता. डीजी शिपिंगच्या वेबसाइटवर सिल्व्होका असोसिएट्स प्रा. लि. (आरपीएसल) कंपनीची माहिती मिळाली. विद्यार्थ्याच्या वडिलांनी कंपनीला संपर्क केल्यानंतर घोडबंदर रोडवरील कावेसर येथे कंपनीचे कार्यालय असून तेथील प्रमुख कॅप्टन सुप्रियो मुखर्जींना भेटा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार वडील आणि मुलगा मागील वर्षी १ सप्टेंबर रोजी कार्यालयात गेले. मुखर्जी याने आपण लायझनिंग ऑफिसर असल्याचे सांगितले. कार्यालयात त्याची पत्नी सौमीदेखील उपस्थित होती. ती या कंपनीची संचालक एचआर अँड फायनान्स असून नवीन शर्मा आणि ग्यासुद्दीन उर्फ आतिफ मुखर्जी हे कर्मचारी तसेच असोसिएट्स असल्याचेही सांगण्यात आले होते. सुप्रियो याने या विद्यार्थ्याची मुलखात घेतली आणि जहाजावरील प्रशिक्षणासाठी साडेतीन लाख रुपये खर्च येईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या वडिलांनी ठरल्यानुसार पैसे दिले. १७ सप्टेंबरला सुदानला पोहचलेला या विद्यार्थ्याला सिल्व्होकाच्या प्रतिनिधीने प्रशिक्षणासाठी न नेता एका खोलीवर नेऊन ठेवले. ऑक्टोबर उजाडूनही जहाजावर न पाठवल्याने अखेर हा विद्यार्थी पुन्हा भारतात परतला. त्याच्या वडिलांनी मुखर्जीकडे पैसे परत करण्याची मागणी केली. नंतर दुबईला पाठवतो, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र कागदपत्रांची पूर्तता न केल्याने विद्यार्थ्याला दुबईलाही जाता आले नाही.

पैसे परत मिळावे यासाठी वडिलांनी कंपनीच्या मुख्य संचालकाला फोन केला. वारंवार मागणी केल्यानंतर ५० हजार रुपये त्यांना मिळाले. पोलिस ठाण्यातही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मुखर्जी आणि नवीन शर्मा यांना बोलावले होते. त्यानंतर आणखी त्यांना ४५ हजार रुपये मिळाले. उर्वरित पैसे परत करण्याविषयी वारंवार संपर्क साधूनही संपर्क झाला नाही. याबाबत त्यांनी न्यायालयात तक्रार केली होती. पोलिस ठाण्यातही तक्रार दिल्याने कंपनीचे संचालक, कॅप्टन मुखर्जी, त्याची पत्नी सौमी तसेच शर्मा आणि आतिक खान यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज