अ‍ॅपशहर

डोंबिवली हादरवणारा तो स्फोट रिअॅक्टरचा!

संपूर्ण डोंबिवलीला हादरवून सोडणाऱ्या व १२ लोकांचे प्राण घेणाऱ्या स्फोटाबाबत रोजच्या रोज नवी माहिती पुढं येत आहे. 'प्रोबेस कंपनीत झालेला तो स्फोट बॉयरलचा नव्हता, तर केमिकल रिअॅक्टरचा होता,' अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Maharashtra Times 28 May 2016, 3:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । डोंबिवली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dombivili blast
डोंबिवली हादरवणारा तो स्फोट रिअॅक्टरचा!


संपूर्ण डोंबिवलीला हादरवून सोडणाऱ्या व १२ लोकांचे प्राण घेणाऱ्या भीषण स्फोटाबाबत रोजच्या रोज नवी माहिती पुढं येत आहे. 'प्रोबेस कंपनीत झालेला तो स्फोट बॉयरलचा नव्हता, तर केमिकल रिअॅक्टरचा होता,' अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

डोंबिवलीतील भीषण स्फोटाची सध्या विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू आहे. हा स्फोट बॉयलरचा होता, असं आतापर्यंत सांगितलं जात होतं. मात्र, कंपनीत बॉयलरच नव्हता, असं कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. रासायनिक प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या रिअॅक्टरमध्ये हा स्फोट झाला होता, अशी माहिती एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली आहे.

दरम्यान, स्फोटात मृत्यू झालेल्या आणखी एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आज हाती लागला. त्यामुळं मृतांची संख्या १२ झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज