डोंबिवली: एका कुटुंबाला जळगावच्या भोंदूबाबाने ३२ लाख रुपयांना गंडा घातला होता. या प्रकरणी पवन पाटील या भोंदूबाबाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. फिर्यादीच्या वडिलांना बरे करण्यासाठी पवनने त्यांच्याकडे देवाला सोन्याची जीभ ओवाळून टाकावी लागेल, अशा भूलथापा दिल्याचे समोर आले आहे. या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी रामनगर पोलिसांचे एक पथक जळगावला रवाना झाले असून, त्यांनी ८ ते १० तोळे सोने हस्तगत केले आहे. डोंबिवलीतील एका कुटुंबाची जळगाव येथील पवन पाटील या भोंदूबाबाने फसवणूक केली होती. त्या कुटुंबाला ३२ लाख रुपयांना गंडा घातला आहे. प्रियंका राणे यांच्या तक्रारीवरुन पवन पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत रामनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेचा तपास रामनगर पोलिसांनी सुरु केला असून, जळगाव येथे पोलिसांचे एक पथक अधिक तपासासाठी रवाना करण्यात आले. या पथकाने पवन याचे बॅंक अकाऊंट गोठवले असून, त्यामध्ये दहा ते अकरा लाख रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पथकाने आठ ते दहा तोळे सोने देखील हस्तगत केले आहे, अशी माहिती रामनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.
फिर्यादीची नोकरी गेली होती. त्यात त्यांच्या वडिलांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना बरे करण्यासाठी भोंदूबाबा पवन याने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले की, देवाला सोन्याची जीभ ओवाळून टाकावी लागेल. तसेच त्यासाठी घरात होमहवन करावे लागेल. ही सोन्याची जीभ सव्वापाच ग्रॅमची होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.