सिंधुदुर्ग : प्रसिद्ध कवी, ललित लेखक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गाढे अभ्यासक डॉ. विद्याधर सीताराम करंदीकर यांचे कणकवली येथे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. विनायक आणि मुलगी असा परिवार आहे. शनिवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. करंदीकर हे व्यवसायाने दंतवैद्य होते; शिवाय ‘सावरकरांची नाट्यसृष्टी’ अभ्यासासाठी त्यांना पीएचडी मिळाली होती.
डॉ. विद्याधर करंदीकर यांचे निधन
प्रसिद्ध कवी, ललित लेखक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गाढे अभ्यासक डॉ. विद्याधर सीताराम करंदीकर यांचे कणकवली येथे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. विनायक आणि मुलगी असा परिवार आहे.
Maharashtra Times 2 Oct 2016, 1:51 am