बेकायदा गुंगीकारक औषध बाळगल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने कल्याणमध्ये एका व्यक्तीविरोधात कारवाई करत औषधाचा साठा जप्त केला आहे. या व्यक्ती विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमर मुनाजीर शेख (४८ रा. कल्याण) असे या आरोपीचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी एफडीएने ही कारवाई केली आहे. यावेळी आरोपीकडे एक पिशवी होती. पिशवीत औषधाच्या एकूण २७ बाटल्या आणि १८ गोळ्या असलेल्या एकूण १८ स्ट्रिप्स अशा २७० गोळ्या आढळून आल्या.
गुंगीकारक औषधे जप्त
बेकायदा गुंगीकारक औषध बाळगल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने कल्याणमध्ये एका व्यक्तीविरोधात कारवाई करत औषधाचा साठा जप्त केला आहे...
Maharashtra Times 17 Aug 2018, 4:00 am