अ‍ॅपशहर

अंबरनाथ, बदलापूरकर धुळीने त्रस्त

यंदा चार महिने झालेल्या दमदार पावसाने शहरातील रस्त्यांची चाळण केली. त्यामुळे तीन महिने पाठीच्या त्रासाने नागरिक त्रस्त झाले होते. त्यात चिखलामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघातही झाले. आता पाऊस थांबला असला, तरी अनेक ठिकाणी नागरिकांची खड्ड्यांतून सुटका झालेली नाही. त्यामुळे आता धुळीच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

Maharashtra Times 25 Oct 2016, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dust problem in ambernath badlapur
अंबरनाथ, बदलापूरकर धुळीने त्रस्त


यंदा चार महिने झालेल्या दमदार पावसाने शहरातील रस्त्यांची चाळण केली. त्यामुळे तीन महिने पाठीच्या त्रासाने नागरिक त्रस्त झाले होते. त्यात चिखलामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघातही झाले. आता पाऊस थांबला असला, तरी अनेक ठिकाणी नागरिकांची खड्ड्यांतून सुटका झालेली नाही. त्यामुळे आता धुळीच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील अनेक भागांतील रस्त्यांची चाळण झाली होती. संततधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर डांबरीकरणाचे, दुरुस्तीचे प्रयत्नही फोल ठरले. नागरिकांच्या संतापानंतर गणेशोत्सवाच्या काळात काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शहरातील काही रस्त्यांची दुरुस्ती करणे शक्य झाले होते. मात्र गणेशोत्सवानंतर पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केल्याने रस्त्यांवर पुन्हा खड्डे पाहायला मिळाले होते. खड्डे बुजविण्याच्या नावाखाली पालिकेने रस्त्यावर मोठमोठे दगड आणि माती आणून टाकली होती. त्यामुळे आता पावसाळा संपल्यानंतरही रस्त्यांची अवस्था तशीच राहिली.

त्याचे आता धुळीत रुपांतर झाले. वाहनांच्या रहदारीमुळे रस्त्यांवर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. परिणामी वाहनचालकांना तोंडावर रुमाल किंवा मास्क बांधून प्रवास करावा लागत आहे. शहरातील अनेक शाळा या रस्त्यांच्या बाजूलाच असल्याने रस्त्यावरील धूळ थेट शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. अंबरनाथमधील बी केबिन रोड आणि फातिमा शाळा या महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी निविदा मंजूर झाल्या आहेत. काही अंशी त्याचे कामही झाले आहे. मात्र खड्डे आणि धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे अंबरनाथ पूर्वेतील अनेक रस्त्याची दुरवस्था झाल्याने तेथेही धुळीने नागरिकांना त्रास होत आहे. बदलापुरातील मांजर्ली ते हेंद्रेपाडा रस्ता, पश्चिमेतील उड्डाणपूल ते स्कायवॉक, रमेशवाडी, पालिका मुख्यालय, गांधी चौक अशा अनेक रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. रस्ते दुरुस्ती आणि डांबरीकरणाची कामे लवकरात लवकर करून किमान धुळीचा त्रास कमी करावा, अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे.


मास्क वापरा

रस्त्यावरील धूळ वाढल्याने श्वसनांच्या आजार झालेल्या रुग्णांची संख्या वाढली असून अनेक खासगी रुग्णालयांत गर्दी वाढलेली दिसते. रस्त्यावरील धुळीमुळे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत शहरातील वातावरणात धुकेसदृश धुळीचे आवरण दिसत आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या श्वसनसंस्थेवर होत आहे. त्यामुळे बाहेर पडताना मास्क लावून निघण्याचा सल्ला अनेक डॉक्टर देत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज