अ‍ॅपशहर

डोंबिवलीत ते फोटो काढल्याने झाला वाद, प्रचंड अस्वस्थता अन् कमालीची शांतता...

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिंदे समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. आता डोंबिवलीतही शिवसेना कर्यकर्त्यांमध्ये संताप आहे. आता एका फोटोवरून वाद तोंड फुटलं आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jun 2022, 8:27 am
डोंबिवली : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे समर्थक विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष शिगेला पेटलाय. त्यातच डोंबिवलीतील शहर शाखेत असलेल्या कार्यालयातील एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढल्याचे दिसून आले. शिंदे पिता पुत्राचे फोटो काढल्याचे कळताच शिंदे समर्थक शाखेत आले असता शिवसेना पदाधिकारी आणि त्यांच्यात वाद झाले. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी फोटो काढून खासदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र शिवसेना पदाधिकारी, शिंदे समर्थकांनी याबाबत कॅमरा समोर बोलण्यास नकार दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde rebel scuffle between shiv sena workers and shinde supporters in dombivli
डोंबिवलीत ते फोटो काढल्याने झाला वाद, प्रचंड अस्वस्थता अन् कमालीची शांतता


एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात अनेक ठीकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसेना कार्यकर्ते स्त्यावर उतरून बंडखोरांच्या विरोधात आंदोलन करत असल्याचे चित्र आहे. एरव्ही कोणतेही आंदोलन असू दे डोंबिवलीची शिवसेना नेहमीच पुढे राहिली आहे. मात्र शिंदे यांच्या बंडानंतर डोंबिवली शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता व कमालीची शांतता दिसत होती.

डोंबिवलीमधील शिवसेना कार्यकर्ते आणि एकनाथ शिंदे समर्थक असे अप्रत्यक्षपणे उभे दोन गट पडले आहेत. उगाच आपसात वाद करण्यापेक्षा वेट एन्ड वॉच अशीच सामंजस्याची भूमिका या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यामुळे डोंबिवली शिवसेनेत शांतता असल्याचे चित्र होते. मात्र ही वादळापूर्वीची शांतता असल्याने पोलिसांनी डोंबिवली शहर शाखेबाहेर बंदोबस्त ठेवल्याने शाखेला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

नव्या सरकारचे फटाके लवकरच फोडू; श्रीकांत शिंदे यांचे सूचक विधान

दरम्यान, डोंबिवली शिवसेना शाखेतच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय आहे. सोमवारी सकाळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. त्यांनी शाखेत लावण्यात आलेले एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढून बाजूला ठेवले. याची खबर मिळताच शिंदे समर्थक शिवसेना शाखेत पोहोचले आणि त्यांनी जाब विचारला. त्यावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाला तोंड फुटले. शाखा कोणाची हा वाद झाला आणि तणावाची परिस्थिती झाली. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यावेळी शिंदे समर्थकांना शाखेतून बाहेर काढा, अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली. यानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. त्यानंतर वातावरण शांत झाले.

'हिशोबात राहा, नाहीतर संपवून टाकू'; मनसे शहराध्यक्षांना धमकीचे पत्र

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज