अ‍ॅपशहर

५५ हजारांचे वीजबिल

महावितरणच्या बिलाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. टिटवाळा येथील चाळीतील एका बंद घराला तब्बल ५५ हजार रुपयांचे बिल महावितरण कंपनीकडून पाठविण्यात आले आहे.

Maharashtra Times 20 Mar 2017, 2:01 am
म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम electric bill of 55 thousand
५५ हजारांचे वीजबिल


महावितरणच्या बिलाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. टिटवाळा येथील चाळीतील एका बंद घराला तब्बल ५५ हजार रुपयांचे बिल महावितरण कंपनीकडून पाठविण्यात आले आहे. टिटवाळ्यातील नांदप रोड येथील इंदिरानगर भागातील लक्ष्मी निवास चाळीत राहणाऱ्या ग्राहकाला महावितरणकडून जादा रकमेचे बिल पाठवण्यात आले आहे.

संबंधित ग्राहक घरामध्ये नसूनसुद्धा मार्च महिन्यात ५९९६ युनिटचे तब्बल ५५ हजार ५६० रुपयांचे बिल महावितरणने पाठविले. याबद्दल महावितरणकडे संबंधित ग्राहकाने तक्रार केली आहे. वीजबिलातील गोंधळाबद्दल अनेकदा आंदोलन करूनसुद्धा महावितरणचा गोंधळ दूर झालेला नाही. रिडींग घेताना झालेल्या चुकांमुळे अनेकदा ग्राहकांना चुकीची बिले पाठविण्यात येत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज