अ‍ॅपशहर

माजी महापौर वीजचोर

वीजचोरीसाठी बदनाम असलेल्या मुंब्र्यात वास्तव्याला असलेले ठाण्याचे माजी महापौर नईम खान यांच्याच घरात वीजचोरी होत असल्याचे भरारी पथकाच्या छाप्यात निष्पन्न झाले आहे. विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून त्याचा वेग कमी करण्यात आला होता, असे तपासणीत निष्पन्न झाले आहे. या वीजचोरीप्रकरणी नईम खान यांना दीडपट दंडात्मक रकमेसह १ लाख १७ हजार रुपये भरण्याची नोटीस बजावली जाणार आहे. त्याशिवाय पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Maharashtra Times 17 Nov 2017, 12:51 am
नईम खान यांच्या घरावर महावितरणचा छापा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ex mayor naeem khan electricity fheft
माजी महापौर वीजचोर

म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे

वीजचोरीसाठी बदनाम असलेल्या मुंब्र्यात वास्तव्याला असलेले ठाण्याचे माजी महापौर नईम खान यांच्याच घरात वीजचोरी होत असल्याचे भरारी पथकाच्या छाप्यात निष्पन्न झाले आहे. विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून त्याचा वेग कमी करण्यात आला होता, असे तपासणीत निष्पन्न झाले आहे. या वीजचोरीप्रकरणी नईम खान यांना दीडपट दंडात्मक रकमेसह १ लाख १७ हजार रुपये भरण्याची नोटीस बजावली जाणार आहे. त्याशिवाय पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वीजचोरी कमी करून मुंब्र्यातील वीजपुरवठ्याला शिस्त लावण्यासाठी महावितरणचे अधिकारी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, खुद्द माजी महापौरांच्या घरातच वीजचोरी होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

महावितरण कंपनीच्या दक्षता आणि भरारी पथकाने ९ नोव्हेंबर रोजी मेराज मंजील येथील नईम खान यांच्या घरावर छापा टाकला होता. मीटरची तपासणी केल्यानंतर त्यात छेडछाड केल्याचे (रेझिस्टन्ट बसविल्याचे ) निष्पन्न झाले. तसेच, वीजभार आणि मीटरवर नोंदविले जाणारे रीडिंग यातही तफावत आढळल्यानंतर मीटरचा वेग कमी करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी नईम खान यांना नोटीस धाडण्यात आली आहे. नियमानुसार गेली दोन वर्षे ही वीजचोरी होत असल्याचे स्पष्ट करत त्यानुसार वीजचोरीची आकडेवारी मांडण्यात आली आहे. साधारणतः ६ हजार ९१२ युनिटची चोरी झाली असून दीडपट दंडात्मक रकमेसह १ लाख १७ हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत दंडात्मक बिल खान यांना धाडले जाईल. ती रक्कम न भरल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज