अ‍ॅपशहर

फायलींचे गहाळसत्र सुरूच

बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यालयातून आदिवासी, कातकारी वाडीतील नागरिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या शौचालयांच्या कामाच्या फाइलसह इतर दोन फाइलही गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वीही शहरातील नाल्यांच्या कामाच्या फाइल गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे कंत्राटदार आणि नगरसेवकांच्या राजकारणाचा फटका शहरातील विकासकामांना बसत आहे, या गहाळ झालेल्या फाइल्सचा शोध लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Maharashtra Times 3 Sep 2016, 3:00 am
बदलापूर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम files lost from badlapur nagarpalika
फायलींचे गहाळसत्र सुरूच

म. टा. वृत्तसेवा, बदलापूर

बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यालयातून आदिवासी, कातकारी वाडीतील नागरिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या शौचालयांच्या कामाच्या फाइलसह इतर दोन फाइलही गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वीही शहरातील नाल्यांच्या कामाच्या फाइल गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे कंत्राटदार आणि नगरसेवकांच्या राजकारणाचा फटका शहरातील विकासकामांना बसत आहे, या गहाळ झालेल्या फाइल्सचा शोध लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेतून काही महिन्यांपूर्वी नैसर्गिक नाल्यांच्या सर्वेक्षणाची फाइल गहाळ झाली. फाइल मुख्याधिकाऱ्यांकडे दिल्याचे नगररचनाकारांनी सांगत जबाबदारी झटकली होती. मात्र वारंवार पालिका अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून फाइल गहाळ होण्यामागे कुणाचा होत आहे, तसेच हे कुणा बांधकाम व्यावसायिकांच्या हिताचे तर नाही ना, असा सवालही सभागृहात उपस्थित झाला. पुन्हा एकदा पालिकेतून एका विकासकामाच्या फाइल गहाळ झाल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बदलापूर गावातील तलावाजवळील सुमारे २५० लोकसंख्या असलेल्या आदिवासी, कातकरी वाडीतील नागरिकांच्या मागणीनुसार या भागात शौचालये बांधून घेण्याचे काम मंजूर करून घेण्यासाठी स्थानिक नगरसेवक सुनील भगत यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर या कामाच्या निविदा काढण्यात आल्या. हे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र तत्पूर्वीच नगरपरिषद कार्यालयातून या कामाची फाइल गहाळ झाल्याने हे काम रखडल्याची माहिती नगरसेवक सुनील भगत यांनी दिली.

बदलापूर पूर्व, पश्चिम भागात पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे व्हावा, यासाठी क्रॉस पाइप टाकण्याच्या कामाचीही फाइल गहाळ झाली असल्याचे समोर येत आहे.

या कामांच्या फाइल्स गहाळ होणे गंभीर बाब असून मुख्याधिकारी देविदास पवार यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे ही बाब आपण त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे, तसेच लवकर या फाइल्सचा शोध घाव्या, अशी मागणी भगत यांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्याधिकारी देविदास पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज