अ‍ॅपशहर

समुद्रात न जाण्याची मच्छिमारांना सूचना

बंगालच्या उपसागरात निर्मान झालेल्या नादा चक्रिवादळामुळे बंगालचा उपसागर खवळला आहे. शिवाय अरबी समुद्रावरही त्याचा परिणाम होणार आहे. किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांचा जोर वाढेल आणि समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रान जावू नये, असा इशाला हवामान खात्याने दिला आहे.

Maharashtra Times 2 Dec 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fishermen should avoid going in sea
समुद्रात न जाण्याची मच्छिमारांना सूचना

बंगालच्या उपसागरात निर्मान झालेल्या नादा चक्रिवादळामुळे बंगालचा उपसागर खवळला आहे. शिवाय अरबी समुद्रावरही त्याचा परिणाम होणार आहे. किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांचा जोर वाढेल आणि समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रान जावू नये, असा इशाला हवामान खात्याने दिला आहे.

तामीळनाडू किनाऱ्याच्या दिशेने सरकणाऱ्या या वादळाचे ‘नादा’ असे नामकरण करण्यात आले आहे. चेन्नईपासून ७७२ किमी अंतरावर येऊन ठेपलेले हे वादळ पुदूचेरी आणि तामिळनाडू यामधील टापूतून मार्गक्रमण करणार आहे. तामिळनाडू येथील कुड्डालोरजवळ शुक्रवारी पहाटे हे चक्रीवादळ येऊन धडक देणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे समुद्रात जाणे धोक्याचे ठरणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

या चक्रीवादळामुळे कुड्डालोर भागात गुरुवारी आणि शुक्रवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तूर्त ताशी २५ किलोमीटर वेगाने हे वादळ धावत असून ही गती आणखी वाढण्याची शकयता आहे.

वादळामुळे निर्माण झालेल्या हवामानातील बदलामुळे केरळ आणि गोवातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज