अ‍ॅपशहर

अपमानाचा सूड घेण्यासाठी तिनं जेवणात विष टाकलं

महड येथील सुभाष रामचंद्र माने यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीच्या जेवणातून सुमारे ८६ जणांना विषबाधा होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथे घडली. या प्रकारणात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विषबाधेच्या या घटनेचा तपास करत असताना ही विषबाधा ही किटकनाशक वापरल्यानं झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात सुभाष माने यांची नातेवाईक असलेली प्रज्ञा उर्फ ज्योती सुरवसे हिला अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2018, 10:52 am
महड:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम food poisoning woman arrested for her involvement in food poisoning
अपमानाचा सूड घेण्यासाठी तिनं जेवणात विष टाकलं


सुभाष रामचंद्र माने यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीच्या जेवणातून सुमारे ८६ जणांना विषबाधा होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथे घडली. या प्रकारणात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विषबाधेच्या या घटनेचा तपास करत असताना ही विषबाधा ही किटकनाशक वापरल्यानं झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात सुभाष माने यांची नातेवाईक असलेली प्रज्ञा उर्फ ज्योती सुरवसे हिला अटक करण्यात आली आहे.

प्रज्ञा उर्फ ज्योती हिचं सुरेश सुरवसे याच्याशी दुसरं लग्न झालं होतं. मात्र कुटुंबातील सर्वजण नेहमी तिचा अपमान आणि मानसिक छळ करत असत. ज्योतीचा रंग, तिला स्वयंपाक न येणं, तिचा पहिला विवाह मोडणं यांवरून तिला सतत हिणवलं जात असत. याचाच राग मनात ठेवून या सर्वाना धडा शिकण्यासाठी तिनं हे कृत्य केल्याचं कबूल केलं आहे.

वास्तुशांतीच्या दिवशी ज्योतीनं कीटकनाशक औषध विकत आणलं संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तिनं वरणाच्या बादलीत हे विषारी किटकनाशक औषध टाकलं . ज्योती हिच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे. तिच्या कटात आणखी कुणाची साथ होती का, याचाही तपास केला जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज