अ‍ॅपशहर

वन कर्मचाऱ्यांचा ‘काम बंद’चा इशारा

ठाणे वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम यांच्या कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी केलेल्या राखफेक आणि शाईफेक आंदोलनाविरोधात मंगळवारी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेकडून निषेध करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंडसंहिता कलम ३५३चा

Maharashtra Times 21 Nov 2018, 2:10 am
राखफेकप्रकरणी वनरक्षक संघटनेचा निषेध
महाराष्ट्र टाइम्स.कॉम forest workers work stop alert
वन कर्मचाऱ्यांचा ‘काम बंद’चा इशारा


म. टा. प्रतिनिधी, ठाणे

ठाणे वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम यांच्या कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी केलेल्या राखफेक आणि शाईफेक आंदोलनाविरोधात मंगळवारी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेकडून निषेध करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंडसंहिता कलम ३५३चा गुन्हा दाखल करण्याची मागणी या संघटनेकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी राजकीय दबावापोटी या कलमाची नोंद केली नसल्याचा आरोप या संघटनेकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन डिसेंबरपर्यंत ३५३चा गुन्हा दाखल झाला नाही तर वनविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी राज्यव्यापी कामबंद आंदोलन करणार आहेत.

अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथील रोपवनामध्ये समाजकंटकांनी आग लावल्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून फुललेली वनराई जळून खाक झाली आहे. या प्रकरणी वनअधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत खासदार शिंदे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कोपरी येथील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर राखफेक केली होती. हल्ल्यामुळे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले असून कामाची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्याची मागणी करणारे पत्र पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना देण्यात आली आहे आहे. मुख्य वनसंरक्षक हे पद भारतीय वनसेवेतील आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याचे असून त्यामुळे असे हल्ले वारंवार होण्याचा धोकाही यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचीही मागणी

मुख्य वनसंरक्षकांच्या अंगावर राख-माती फेकणे, कुंड्या फोडणे असे प्रकार सोमवारच्या आंदोलनादरम्यान घडले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी समानतेनुसार हल्लेखोर शिवसैनिकांवरही ३५३चा गुन्हा दाखल करावा. सामान्य माणसांने सरकारी अधिकाऱ्याला धारेवर धरले किंवा न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अनुसरला तर ज्या पद्धतीने कायद्याचा बडगा उचलून सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल होता. तोच न्याय येथेही लावून पोलिसांवर दबाव नसल्याचे दाखवून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज