अ‍ॅपशहर

स्टेशन परिसरात विनामूल्य पार्किंग

रेल्वे स्टेशन परिसरातील पश्चिम भागात मागील अनेक दिवसांपासून एका राजकीय व्यक्तीच्या आशीर्वादाने अनधिकृत पार्किंगचा ठेका चालवला जात होता. याबाबत उल्हासनगर महापालिकेकडे अनेक तक्रारी येत होत्या. मात्र सत्ता परिवर्तन होताच, भाजपने सत्तेची चक्रे फिरवत या पार्किंगचा भूखंड पालिकेच्या मालमत्ता विभागाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

Maharashtra Times 10 Apr 2017, 3:00 pm
पार्किंग चालकाला भाजपचा दणका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम free parking in ulhasnagar station area
स्टेशन परिसरात विनामूल्य पार्किंग


म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर

रेल्वे स्टेशन परिसरातील पश्चिम भागात मागील अनेक दिवसांपासून एका राजकीय व्यक्तीच्या आशीर्वादाने अनधिकृत पार्किंगचा ठेका चालवला जात होता. याबाबत उल्हासनगर महापालिकेकडे अनेक तक्रारी येत होत्या. मात्र सत्ता परिवर्तन होताच, भाजपने सत्तेची चक्रे फिरवत या पार्किंगचा भूखंड पालिकेच्या मालमत्ता विभागाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. तसेच जोपर्यंत नवीन निविदा जाहीर होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी वाहनांना विनामूल्य पार्किंगची सूट दिली आहे.

उल्हासनगर शहरातील अनेक भूखंड अनधिकृत बांधकाम करणाऱ्या माफियांनी गिळंकृत केले आहेत. तसेच अनेक भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. शहरातील पालिकेच्या काही जागांवर राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने स्थानिक दादांकडून अनधिकृत पार्किंगचा ठेका चालवला जात आहे. पालिकेकडे कुठलीही आर्थिक रक्कम जमा न करता नागरिकांची लूट करण्याता येत आहे. असाच प्रकार उल्हासगर रेल्वे स्टेशन पश्चिम भागातील एका जागेवरून समोर आला. उल्हासनगर रेल्वे स्टेशनला लागून पालिकेचा हरीत पट्ट्याचा भूखंड आहे. त्याला लागून परिवहन सेवेच्या डेपोसाठी आरक्षित केलेली जागा आहे. या जागेवर मागील काही वर्षांपासून राजू मनी पिल्ले पार्किंगच्या नावाखाली वाहनचालकांची लूट करत आहे. या पार्किंगसाठी पालिकेनेही निविदा काढली होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने या ठिकाणी बेकायदा पार्किंग सुरू होती. अखेर भाजपची सत्ता येताच शहरातील शिवसेनेच्या जवळील व्यक्तींना धक्का देण्याचे तंत्र भाजपने हाती घेतले आहे. तसेच पालिकेकडे येणाऱ्या तक्रारींवरूनही ही बाब आयुक्त सुधाकर शिंदे आणि उपायुक्त लेंगरेकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी हा भूखंड ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी दुपारी मालमत्ता विभागाच्या पथकाने कारवाई करत हे बेकायदा पार्किंग बंद केले. ही जागा पालिकेच्या अखत्यारित येत असल्याने निविदा प्रक्रिया होत नाही तोपर्यंत या ठिकाणी नागरिकांना विनामूल्य पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी तीन पाळ्यांमध्ये सुरक्षारक्षकही नेमण्यात आले आहेत. या जागेला कम्पाऊण्ड घालून तेथे पार्किंगची सोय केली जाणार असल्याचे पालिकेचे उपायुक्त जमील लेंगरेकर यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज