अ‍ॅपशहर

मुशायऱ्याला गुलजार

मुंब्रा येथील मित्तल पटांगणात २४ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कुल हिंद मुशायरा होणार असून त्यात प्रख्यात गीतकार गुलजार यांच्यासह मुन्नवर राणा आणि डॉ. कुमार विश्वास यांच्या अजरामर शायरीचा आस्वाद ठाणे आणि मुंब्रावासियांना घेता येणार आहे.

Maharashtra Times 24 Dec 2016, 1:24 am
ठाणे : मुंब्रा येथील मित्तल पटांगणात २४ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कुल हिंद मुशायरा होणार असून त्यात प्रख्यात गीतकार गुलजार यांच्यासह मुन्नवर राणा आणि डॉ. कुमार विश्वास यांच्या अजरामर शायरीचा आस्वाद ठाणे आणि मुंब्रावासियांना घेता येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gulzar in mumbar thane
मुशायऱ्याला गुलजार


संघर्ष सेवाभावी संस्था आणि पासबा मुशायरा समितीने हा मुशायरा आयोजित केला आहे. या वर्षीही देशभरातील नामवंत शायर आणि गझलकारांना पाचारण करण्यात आले आहे. इम्रान प्रतापगडी, अल्ताफ झिया, रेहान हाशमी, नदीम फारुखी, अखिल राज इंदोरी, भिम अख्तर, वाहिद अन्सारी, मनोज पाल, नासिर जौनपुरी, अकमल बलरामपुरी असे शायर शायरी सादर करणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज