अ‍ॅपशहर

बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार

उसने दिलेले साडेतीन लाख रुपये परत मागितल्याच्या रागातून १५ ते २० जणांच्या टोळक्याने डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक गीतेश पाटील यांच्या घरावर शनिवारी पहाटे १ वा ४५ मिनिटांनी हल्ला करून गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी सुमारे २० जणांविरोधात जिवे ठार मारल्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवलीतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे येथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Maharashtra Times 14 Jan 2018, 4:00 am
उसने दिलेले पैसे परत मागितल्याचा राग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gun firing on construction businessman in dombivali
बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार

म. टा. प्रतिनिधी, कल्याण
उसने दिलेले साडेतीन लाख रुपये परत मागितल्याच्या रागातून १५ ते २० जणांच्या टोळक्याने डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक गीतेश पाटील यांच्या घरावर शनिवारी पहाटे १ वा ४५ मिनिटांनी हल्ला करून गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी सुमारे २० जणांविरोधात जिवे ठार मारल्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवलीतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे येथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
डोंबिवलीतील नांदिवली येथे सदगुरू शुभम इमारतीसमोर गीतेश पाटील राहतात. पहाटेच्या सुमारास ते घरी हॉलमध्ये टीव्ही बघत होते. त्यावेळी आगासन सोनारपाडा येथे राहणाऱ्या आरोपींनी लाकडी स्टम्प, हॉकी स्टिक, तलवारी व पिस्तुल घेऊन त्यांच्या घरावर हल्ला केला. आरोपींपैकी एकाने त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये उसने घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे पैसे परत मागितल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पाटील यांच्या घराच्या काचा फोडून पिस्तुलातून त्यांच्या दिशेने गोळीही झाडण्यात आली. पण पाटील यांच्या सुदैवाने ती त्यांना लागली नाही. यावेळी आरोपींनी त्यांच्या आईलाही किरकोळ मारहाण केली. याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज