अ‍ॅपशहर

प्रमाणपत्र मिळविण्याचे ‘दिव्य'

बंद खोलीसमोर उभे असलेले हजारो पालक, प्रसुतीगृहासमोर भेदरलेली लहान मुले, अस्वच्छ व्हरांड्यात अडचणीत उभे असलेल्या दिव्यांग व्यक्ती आणि अपंगत्वाचा दाखला मिळविण्यासाठी तब्बल सहा तासांहून अधिक काळ घालवावा लागणारा वेळ… ठाण्यातील सिव्हिल रुग्णायालयात दर बुधवारी दिव्यांगांना ही तारेवरची कसरत करावी लागते. रुग्णालय प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे अपंगांचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यातून जावे लागत असल्याचा आरोप दिव्यांगांच्या कुटुंबियांकडून होत आहे.

Maharashtra Times 23 Jul 2017, 4:30 am
नियोजनशून्य कारभारामुळे सिव्हिल रुग्णालयात दिव्यांग वेठीला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम handicap certificate getting delayed
प्रमाणपत्र मिळविण्याचे ‘दिव्य'


सानिका कुसूरकर,ठाणे

बंद खोलीसमोर उभे असलेले हजारो पालक, प्रसुतीगृहासमोर भेदरलेली लहान मुले, अस्वच्छ व्हरांड्यात अडचणीत उभे असलेल्या दिव्यांग व्यक्ती आणि अपंगत्वाचा दाखला मिळविण्यासाठी तब्बल सहा तासांहून अधिक काळ घालवावा लागणारा वेळ… ठाण्यातील सिव्हिल रुग्णायालयात दर बुधवारी दिव्यांगांना ही तारेवरची कसरत करावी लागते. रुग्णालय प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे अपंगांचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यातून जावे लागत असल्याचा आरोप दिव्यांगांच्या कुटुंबियांकडून होत आहे.

शारिरीक अपंगत्व, खुटंलेली बौद्धिक वाढ, मंदत्व अथवा सेरेब्रल पारसी आणि ऑटिझम सारख्या अनेक आजारांच्या रुग्णांना अपंगत्वाचा दाखल घ्यावा लागतो. अशा मुलांच्या शैक्षणिक संस्था, त्यांच्यावरील उपचार, सरकारकडून मिळणाऱ्या सवलती अशा अनेक कारणांसाठी लागमारा हा दाखला जिल्ह्यात केवळ सिव्हिल रुग्णालयात दर आठवड्याला बुधवारी दिला जातो. बुधवार हा एकच दिवस सरकारतर्फे देण्यात आल्याने दर बुधवारी सिव्हिलमध्ये हजारोंची गर्दी उसळते. मात्र या गर्दीचे नियोजन करणे सिव्हिल रुग्णालय प्रशासनाला अद्याप जमले नसल्याचे दिसून येते. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था केलेली दिसत नाही.

स्वतंत्र व्यवस्थाच नाही

प्रमाणपत्र तसेच रुग्णाची चाचणी या सर्वांसाठी एका लहान खोलीत कक्ष उभारण्यात येत असल्याने रुग्णांना उभे राहण्याची सोय नसते. कक्षाबाहेरील व्हरांड्यात अथवा रुग्णालयाच्या अस्वच्छ आवारात दिव्यांग लहान मुले दिवसभर उभी राहतात. या मुलांमध्ये शारीरिक अथवा मानसिक वैगुण्य असल्याने त्यांना दिवसभर उभे राहणे शक्य होत नाही. मात्र त्यांच्यासाठी कोणतीही सोय अद्याप केली गेलेली नाही. हा कक्ष प्रसुतीगृहासमोर असल्याने तेथे सातत्याने येणाऱ्या महिला, शस्त्रक्रियांवेळी होणारा गोंधळ हे चित्र पाहून सर्वच मुले धास्तावतात.

कर्मचाऱ्यांची वानवा

अपंगांच्या कक्षातही केवळ दोन किंवा तीन कर्मचारी असल्याने शेकडो मुलांचा भार त्यांच्यावर पडतो. हे कर्मचारी अनेकदा नियोजित वेळेपेक्षा दोन तास दिरंगाईने येत असल्याने काम सुरू होण्यास उशीर होतो. कोणत्याही सुविधेअभावी दिवसभर उभे रहावे लागत असल्याची तक्रारही पालक करतात. त्यासह केवळ काही मोजक्या कर्मचाऱ्यांवर प्रक्रिया अवलंबून असल्याने अनेक तासांनंतरही प्रमाणपत्र पालकांच्या हाती मिळत नसल्याने पुन्हा दुसऱ्या बुधवारची वारी करावी लागत असल्याचेही चित्र दिसून येते. प्रशासनाच्या एकूण सावळ्यागोंधळावर पालक त्रस्त असून या कारभारात सुसुत्रता यावी अशी मागणी होत आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.


दिव्यांग आणि त्यांचे पालक हे मुळातच विविध समस्यांतून जात असतात. मात्र त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. त्यासाठी महापालिकेच्या शाळा, अथवा इतर रुग्णालये येथे प्रमाणपत्र देणारी केंद्र उघडल्यास एका केंद्रावरील गर्दी कमी होईल आणि सुस्थितीतील केंद्रावर कामे सुरळीत होतील.

सुनैना मेंगलोरकर, पालक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज