अ‍ॅपशहर

उच्चशिक्षित ‘शिपाई’ उमेदवार

ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपाईपदाच्या भरतीसाठी उच्चशिक्षित उमेदवारांचे अर्ज आले असून पदवीधर उमेदवारांची संख्या साडेनऊ हजार तर पदव्युत्तर पदवी आणि अन्य शिक्षण असलेल्या उमेदवारांची संख्या साडेचार हजारांहून अधिक आहे.

Maharashtra Times 15 Mar 2018, 1:47 pm

पोलिस भरतीच्या चाचणीवेळी मोबाइलवर बंदी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम highly educated constable candidates
उच्चशिक्षित ‘शिपाई’ उमेदवार


म. टा. वृत्तसेवा, ठाणे

ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपाईपदाच्या भरतीसाठी उच्चशिक्षित उमेदवारांचे अर्ज आले असून पदवीधर उमेदवारांची संख्या साडेनऊ हजार तर पदव्युत्तर पदवी आणि अन्य शिक्षण असलेल्या उमेदवारांची संख्या साडेचार हजारांहून अधिक आहे. ही भरती पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणे व्हावी, यासाठी ठाणे पोलिसांनी विविध उपयोजना केल्या असून मैदानावर उमेदवारांसह भरतीप्रक्रियेत सहभागी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनाही मोबाइलचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

ठाणे पोलिसांच्या साकेत येथील क्रीडा संकुलात उमदेवारांची मैदानी चाचणीस प्रारंभ झाला आहे. मात्र उमेदवारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मैदानी चाचणी पहाटे ५ ते ११.३० आणि दुपारी ३.३० ते ६.३० या दोन सत्रात घेण्यात येत आहे. तसेच १६०० मीटर धावण्याच्या चाचणीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांची सावली असणारा रस्त्यावर ही चाचणी घेण्यात येत आहे. पिण्याची पाण्यासह प्रसाधनगृहाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. धावताना उमेदवारांना त्रास होऊ नये यासाठी मैदानावर पाण्याची फवारणी करण्यात आली असून प्रथमोपचार साहित्यासह रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली आहे. पोलिस भरतीमध्ये डमी उमेदवार सहभागी होऊ नये, यासाठी मैदानाच्या चारही बाजू बंदिस्त करण्यात आलेल्या आहेत. पोलिस भरतीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले असून प्रत्येक चाचणीचे व्हिडीओ शुटींगही करण्यात आले आहे. तसेच पोलिस भरती प्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या रंगाची ओळखपत्रे देण्यात आली आहेत.

भरतीदरम्यान कोणतीही गडबड होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष काळजी घेतली असून पोलिस शिपाईपदाची एकूण २३८ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी एकूण ४९ हजार ३२ अर्ज आलेले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर उच्चशिक्षित उमेदवारही पोलिस भरतीमध्ये उतरले असल्याचे चित्र आहे. एचएससी उमदेवारांची संख्या ३४ हजार ६८९ इतकी आहे. तर ९ हजार ५६६ उमेदवार पदवीधर असून पदव्युत्तर पदवी आणि इतर शिक्षण असलेल्या उमदेवारांची संख्या ४ हजार ७७७ असल्याची माहिती बुधवारी ठाणे पोलिसांनी दिली.

आमिषाला बळी पडू नका

उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. कोणी पैशाची मागणी करत असल्यास ठाणे पोलिसांकडे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधा, असे आवाहन ठाणे पोलिसांनी उमेदवारांना केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज