अ‍ॅपशहर

हाऊस ऑफ म्युझिक

शास्त्रीय संगीताच्या गायिका शोभा केळकर यांच्या कल्पनेतून साकारलेले हाऊस ऑफ म्युझिक… संगीतायन ही वास्तू ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या घंटाळी येथील शाळेसमोर नृत्य, गायन, वादन या कलांसाठी तयार झाली आहे. कला सादरीकरणाच्या उपक्रमांसाठी अत्यंत माफक दरात ही वास्तू संगीतप्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे.

Maharashtra Times 24 Jul 2016, 2:29 am
शास्त्रीय संगीताच्या गायिका शोभा केळकर यांच्या कल्पनेतून साकारलेले हाऊस ऑफ म्युझिक… संगीतायन ही वास्तू ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या घंटाळी येथील शाळेसमोर नृत्य, गायन, वादन या कलांसाठी तयार झाली आहे. कला सादरीकरणाच्या उपक्रमांसाठी अत्यंत माफक दरात ही वास्तू संगीतप्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम house of music
हाऊस ऑफ म्युझिक


शास्त्रीय संगीतात काही चांगले काम आपल्या हातून केले जावे, असा विचार करून शास्त्रीय सांगीताच्या गायिका शोभा केळकर यांनी हा हाऊस ऑफ म्युझिकचा उपक्रम हाती घेण्याचे ठरविले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आषाढ महिन्यात येणारी गुरूपौर्णिमा ही भारतीय नृत्य, संगीत विश्वात खूपच महत्त्वाची असते. गुरूकडून मिळालेल्या विद्येचं सादरीकरण करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. गुरूपूजनाची ही प्रथा सर्व शिष्यगण अत्यंत भक्तिभावाने पाळतात. पण त्याही पलिकडे जाऊन गुरूविद्येचा प्रसार आणि प्रचार करून भावी पिढीपर्यंत हे विद्याधन पोहोचावे यासाठी काही मोजकेच शिष्यगण पुढाकार घेतात. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे शोभा केळकर. ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गुरूवर्य विदुलाताई भागवत यांच्याकडे संगीत साधना करणाऱ्या शोभाताई गेली अनेक वर्षे संगीत विद्यादानाचे काम अत्यंत तळमळीने पार पाडत आहेत. त्या जवळपास २३ वर्षे संगीताच्या क्षेत्रात आहेत. प्रारंभीची काही वर्षे संगीत साधना करण्यात गेली आणि त्यानंतरचा पुढील काळ हा आतापर्यंत संगीत ज्ञानदानाचे काम करण्याचा आहे. अशातच कलाकारांना तालीम करण्यासाठी माफक दरात जागा उपलब्ध व्हावी, हा विचार त्यांनी केला. त्यांची स्वतःची जागा होतीच. मग या विचाराला पुढे नेत त्या जागेचे रूपांतर त्यांनी क्लासरूम पद्धतीत केले आणि हाऊस ऑफ म्युझिक अर्थात संगीतायन उदयाला आले. ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या घंटाळी येथील शाळेसमोर नृत्य, गायन, वादन या कलांसाठी तयार झाली आहे. गुरू विदुलाताई भागवत यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन गुरूपौर्णिमेच्या दिवशी पार पडले.

संगीत, नाट्य, नृत्य कार्यशाळा, तालीम, कला सादरीकरण अशा उपक्रमांसाठी अत्यंत माफक दरात ही वास्तू संगीतप्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे, असे शोभा केळकर म्हणाल्या. या वास्तूमधील पहिला बहारदार कार्यक्रम विदुलाताई भागवत आणि त्यांच्या शिष्यगणांनी सादर केला. संगीत साधकांनी आपली गायन, वादन, नृत्य कलांची साधना सुरू ठेवण्यासाठी ही नवीन सुविधा ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू झाली आहे. आपले अभिजात संगीत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, नवीन कलाकारांना कला सादरीकरणात कोणत्याही अडचणी येऊ नयेत, हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे अधिकाधिक कलाकारांनी, संस्थांनी या हाऊस ऑफ म्युझिकचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज