अ‍ॅपशहर

'सीएए' समर्थकांवर आव्हाड बरसले, बापाचा उल्लेख

नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) च्या मुदद्यावरून देशभर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याच मुद्द्यावरून भाजपसह सीएएच्या समर्थकांवर घणाघाती टीका केली आहे. आव्हाड यांनी नागरिकत्वाचे पुरावे मागणाऱ्यांवर टीका करताना त्यांच्या बापाचा उल्लेख केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jan 2020, 3:07 pm
मुंबई: नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) च्या मुदद्यावरून देशभर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याच मुद्द्यावरून भाजपसह सीएएच्या समर्थकांवर घणाघाती टीका केली आहे. आव्हाड यांनी नागरिकत्वाचे पुरावे मागणाऱ्यांवर टीका करताना त्यांच्या बापाचा उल्लेख केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jitendra Awhad


भिवंडीतील धामणकरनाका येथील स्व. परशुराम टावरे स्टेडियममध्ये आयोजित एका जाहीर सभेत ते बोलत होते. संविधान बचाव संघर्ष समितीनच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी आव्हाड यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात 'सीएए'च्या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवताना ते म्हणतात, 'मी दिल्लीच्या तख्ताला विचारू इच्छितो की आता तुम्ही आमच्याकडं देशवासी असल्याचे पुरावे मागणार? मग ऐका, तुमचा बाप जेव्हा खाली मान घालून इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा आमचा बाप फाशीच्या दोराचं चुंबन घेऊन 'इन्किलाब झिंदाबाद'च्या घोषणा देत होता.'

वाचा: पंजाब विधानसभेत ‘सीएए’विरोधी ठराव मंजूर

CAA: हिंदू शरणार्थींना राजस्थानात अर्ध्या किमतीत घर

'केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला माझा प्रखर विरोध आहे. हा कायदा हिटलरशाही प्रवृत्तीच्या लोकांनी जाणीवपूर्वक लागू केला आहे. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांना छेद देणारा आहे. या कायद्याविरुद्धची लढाई म्हणजे डॉ. आंबेडकर विरुद्ध गोळवलकर अशी आहे. या कायद्याविरोधात जेव्हा कधी आणि जिथं कुठं आंदोलन होईल, त्यात माझा सहभाग असेल,' अशी ग्वाही आव्हाड यांनी यावेळी दिली. 'सीएए'ला विरोध म्हणून २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी प्रत्येक चौकात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करा,' असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

वाचा: पाकिस्तानच्या २८३८ जणांना नागरिकत्व

वाचा: नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून काँग्रेसमध्येच मतमतांतरे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज