अ‍ॅपशहर

पत्नीची हत्या, पतीला उत्तरप्रदेशमधून अटक

पत्नीची हत्या करून फरारी झालेल्या पतीला ठाणे खंडणीविरोधी पथकाने मोठ्या शिताफीने उत्तर प्रदेशमधून अटक केली. आठ दिवसांपूर्वी कल्याणच्या उंबर्डे गावात हत्याकांड घडले होते. आरोपीने हत्येची कबुली दिली असून पुढील चौकशीसाठी आरोपीला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Maharashtra Times 10 Sep 2019, 1:28 am
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arrest

पत्नीची हत्या करून फरारी झालेल्या पतीला ठाणे खंडणीविरोधी पथकाने मोठ्या शिताफीने उत्तर प्रदेशमधून अटक केली. आठ दिवसांपूर्वी कल्याणच्या उंबर्डे गावात हत्याकांड घडले होते. आरोपीने हत्येची कबुली दिली असून पुढील चौकशीसाठी आरोपीला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

विक्रम भारती (२५) असे या आरोपीचे नाव असून तो बिगारीकाम करतो. उंबर्डे गावातील वसंत भोईर चाळीत राहणाऱ्या विक्रमने पत्नी रेखा हिची घरातच निर्घृण हत्या केली आणि तो पसार झाला. २ सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांनी आरोपीचा शोध चालू केला. याशिवाय ठाणे खंडणीविरोधी पथकाकडूनही या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत होता. आरोपी रविवारी पहाटे नातेवाईकांना भेटण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये येणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एक पथक आरोपीला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशला रवाना झाले. गोरखपूर जिल्ह्यातील पुरन्हा गावात सापळा लावून विक्रमला अटक केली. अशा प्रकारे आठवडाभरापासून फरारी असलेल्या आरोपीला पडकण्यास पोलिसांना यश आले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, संजय शिंदे, विकास घोडके, पोलिस उपनिरीक्षक रमेश कदम यांच्या पथकाने केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज