अ‍ॅपशहर

विवाहितेला जिवे मारण्याचा प्रयत्न

माहेरून पैसे आणण्यास सासरच्या मंडळींना नकार दिल्याने डोंबिवलीमधील एका विवाहितेला फिनाइल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले.

Maharashtra Times 8 Jun 2017, 3:00 am
कल्याण : माहेरून पैसे आणण्यास सासरच्या मंडळींना नकार दिल्याने डोंबिवलीमधील एका विवाहितेला फिनाइल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. यामधून बचावलेल्या महिलेच्या जबानीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम husband tried to murder of wife
विवाहितेला जिवे मारण्याचा प्रयत्न


पीडित महिला डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड येथील शेलार अपार्टमेंटमध्ये राहते. या महिलेचे महिनाभरापूर्वी लग्न झाले आहे. पती आणि सासरच्यांनी तिला घरात समान घ्यायचे असल्याने माहेरून पैसे आणण्यास सांगितले. तिने माहेरून १ लाख रुपये आणले. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा ५० हजारांची मागणी केली. मात्र माहेरची परिस्थितीत बेताची असल्याने तिने पैसे आणण्यास नकार दिला. त्यामुळे पतीसह सासू सासरे आणि दिराने या महिलेचा छळ केला आणि तिला फिनाइल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यामधून ही महिला बचावली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेने दिलेल्या जबानीवरून टिळकनगर पोलिसांनी पतीसह सासू, सासरा आणि दिराविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज