अ‍ॅपशहर

विसर्जन निर्विघ्न

गणरायाच्या आगमनाच्या आधीपासूनच पारसिक रेतीबंदर विसर्जन महाघाटाच्या मार्गावरील खड्ड्यांचे शुक्लकाष्ट ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवसापर्यंत पालिका प्रशासनाने दूर सारले. त्यामुळे मंगळवारी ठाण्यासह मुलुंड, भांडुप पट्ट्यातील मोठ्या आणि मध्यम आकाराच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन निर्विघ्न पार पडले.

Maharashtra Times 7 Sep 2017, 3:00 am
खड्डे बुजवल्याने मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन सुरळीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम immersion process without problems
विसर्जन निर्विघ्न


म. टा. प्रतिनिधी, ठाणे

गणरायाच्या आगमनाच्या आधीपासूनच पारसिक रेतीबंदर विसर्जन महाघाटाच्या मार्गावरील खड्ड्यांचे शुक्लकाष्ट ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवसापर्यंत पालिका प्रशासनाने दूर सारले. त्यामुळे मंगळवारी ठाण्यासह मुलुंड, भांडुप पट्ट्यातील मोठ्या आणि मध्यम आकाराच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन निर्विघ्न पार पडले. विशेष म्हणजे, वाहतूक शाखेच्या नियोजनबद्ध यंत्रणेमुळे विसर्जन मार्गावरील कोंडीचे विघ्नही दूर झाल्याने सर्वसामान्य गणेशभक्तांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे पारसिक रेतीबंदर महाघाट येथे विसर्जन करण्यात आले. मात्र यावेळी रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे आणि महाघाट मार्गावर झालेल्या कोंडीने गणेशभक्तांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्यातून ऐन अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येदेखील मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी धास्ती निर्माण झाली होती. यामध्ये विसर्जन महाघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांसह या भागात होणाऱ्या अवजड वाहनांच्या कोंडीचा प्रश्न डोकेदुखी ठरणारा होता. मात्र वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी काटेकोर अवजड वाहनांचे केलेले नियमन तसेच जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून अवजड वाहनांची पर्यायी मार्गाने केलेली शहराबाहेर रवानगी आदींमुळे विसर्जनघाट परिसरात कोंडी निर्माण झाली नाही. तसेच महापालिका प्रशासनाकडून उत्तम पद्धतीने व्यवस्था करण्यात आल्याचे श्रीनगर येथील वागळेचा विघ्नहर्ता अशी ख्याती असलेल्या बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष समीर सावंत यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज