अ‍ॅपशहर

कोंडी सुटणार

बदलापूर स्टेशन परिसरातील वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे. याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी बदलापूर पालिकेला भेट देत, शहरातील वाहतूककोंडीची समस्या जाणून घेतली.

Maharashtra Times 14 Oct 2017, 4:00 am
वाहतूक शाखा उपायुक्तांचे सुविधा पुरवण्याचे आश्वासन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम issue of traffic jam in badlapur in will be solve
कोंडी सुटणार


म. टा. वृत्तसेवा, बदलापूर

बदलापूर स्टेशन परिसरातील वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे. याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी बदलापूर पालिकेला भेट देत, शहरातील वाहतूककोंडीची समस्या जाणून घेतली. लवकरच या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी आणि वाहतूक पोलिसांना कोंडी सोडवण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या सुविधा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शहरात प्रवाशांच्या वाढत्या संख्येसोबत शहरातील वाहतूककोंडी वाढत आहे. स्टेशन परिसरात रिक्षा स्टॅण्ड आणि रिक्षांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे पूर्व पश्चिम भागातील स्टेशन परिसरात होणारी वाहतूककोंडी त्रासदायक ठरत आहे. स्टेशन परिसरातील रस्तेही अपुरे ठरत आहे. वाहतूक पोलिस हतबल ठरत होते. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेही वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांची भेट घेत त्यांना शहरातील वाहतूककोंडीवर पर्याय काढण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. अखेर शहरातील वाहतूककोंडीची समस्या लक्षात घेता, अमित काळे यांनी बदलापूर शहराला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पालिकेतही भेट देत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा केली.

स्टेशन परिसरातील वाहतूककोंडीची पाहणी केली. यावेळी त्यांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीला वॉर्डनची नेमणूक करणे, वर्दळीच्या रस्त्यावर नो पार्किंगचे बोर्ड लावणे, वाहतूक पोलिसांच्या मदतीला टोइंग व्हॅन उपलब्ध करणे, पालिकेचे बांधून तयार असलेले मात्र वापरात नसलेले पार्किंग सुरू करणे, या विषयांवर चर्चा करत वाहतूक विभागाकडून संबंधित सुविधा देण्यात येतील, असे सांगितले.

अवजड वाहनांसाठी निश्चित वेळ

लवकरच शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशाबाबत एक वेळ निश्चित करत स्टेशन परिसरातील रिक्षांच्या बेशिस्तपणाला चाप लावण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचेही सहाय्यक आयुक्त गोसावी यांनी सांगितले. त्यामुळे वाहतूक उपायुक्त काळे यांनी केलेल्या पाहणीनंतर बदलापुरातील वाहतूककोंडीचा प्रश्न येत्या काळात मार्गी लागण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज