अ‍ॅपशहर

Awhad : द काश्मीर फाइल्स चित्रपट अश्लील, आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय- जितेंद्र आव्हाड

द काश्मीर फाइल्स चित्रपटावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. इफ्फीच्या पंचांनी केलेल्या वक्तव्यामुळे चित्रपटावरून वादाला तोंड फुटलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या वादात उडी घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटावर पुन्हा टीका केली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2022, 8:36 pm
ठाणे : इस्रायली दिग्दर्शक आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) चे पंच (ज्युरी) चेअरपर्सन नदाव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स'ला अश्लील आणि अपप्रचार म्हणून संबोधल्यानंतर आता ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. यावर माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्राय पातळीवर चित्रपटाची अब्रु गेली. त्यात इस्रायल काय म्हटलं किंवा इस्रायलच्या दुतावासाने काय म्हटलं? हे महत्त्वाचं नसल्याची आव्हाड यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jitendra awhad on the kashmir files
द काश्मीर फाइल्स चित्रपट अश्लील, आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय- जितेंद्र आव्हाड


'द काश्मीर फाइल्स' ला 'अश्लील आणि अपप्रचार' करणारा चित्रपट असून या चित्रपटात काही सत्यता नसल्याचं आम्ही पहिल्या दिवसांपासून बोलत होतो. तेव्हा कोणीही ऐकायला तयार नव्हतं. आज राष्ट्रीय पातळीवर इज्जत जात आहे, तेव्हा सगळे जागे होतात. यात इफ्फी (IFFI) म्हणजेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा संपूर्ण वेगळा भाग आहे. चित्रपट कुठल्या दृष्टीकोनातून बघायचा त्यातील सौंदर्य काय आहे, हे तपासायचं काम महोत्सवातील पंच करतात. याच महोत्सवातील पंचांनी २५ चित्रपटातील २४ चित्रपटांना चांगलं म्हंटलं आणि या एका चित्रपटाला वल्गर म्हणजेच अश्लील म्हटलं आहे. यात इस्रायल दुतावासाचा काही एक संबंध नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

राजीनामा द्या, पटकन विमान पकडा आणि जा; जितेंद्र आव्हाड यांचा राज्यपाल कोश्यारींवर

इस्रायलनं काय म्हटलं किंवा इस्रायलचा दुतावास काय म्हणालं? हे महत्त्वाचं नाही. हे बोलणारा माणूस इस्रायली आहे का? हे महत्त्वाचं नाही. ज्या व्यक्तीने चित्रपटाबद्दल बोललं आहे तो त्या चित्रपट थेटर क्षेत्रातील मोठा व्यक्ती आहे. त्याचं त्या क्षेत्रात मोठ नाव आहे. त्यामुळे त्या ज्युरीच्या म्हणण्याला अर्थ आहे. मग तो इस्रायलचा असो वा आणखी कुठला असो, त्याच्याशी काही घेणं देणं नसल्याचं देखील राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

मुंबई-ठाणे वाहतूक कोंडींवर पर्याय सापडला, 'या' मार्गावर बांधणार U आकाराचा उड्डाणपूल

महत्वाचे लेख