अ‍ॅपशहर

लाखोंची रोकड लुटली

डोंबिवलीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शुक्रवारी भरदुपारी एका खासगी फायनान्स कंपनीची लाखोंची रोकड लुटल्याची घटना उघड झाली.

Maharashtra Times 19 Aug 2017, 3:00 am
दिवसाढवळ्या हल्ला करून चोरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kakh rupees stole in dombivali
लाखोंची रोकड लुटली


म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली

डोंबिवलीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शुक्रवारी भरदुपारी एका खासगी फायनान्स कंपनीची लाखोंची रोकड लुटल्याची घटना उघड झाली. यामध्ये कंपनीचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे वर्दळीच्या ठिकाणी आणि दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील सागाव परिसरात दुपारी ४ ते ४.३० वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. येथे असणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीची रोकड नेली जात असताना इमारतीखाली दबा धरून बसलेल्या दोघांनी या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. तसेच ही लाखोंची रोकड बाळगणाऱ्याला लक्ष्य करत त्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार करून लाखोंची रक्कम लुटून नेली. त्यानंतर शेजारील गल्लीतून हे दरोडेखोर पसार झाले. जखमी झालेल्या या कर्मचाऱ्याला डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यामध्ये किती रक्कम नेमकी चोरीला गेली आहे, याचा आकडा समजलेला नाही. अंदाजे १८ लाखांची रोकड लुटून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज