अ‍ॅपशहर

कल्याण: दुचाकीसह 'तो' खाडीत पडला

शनिवारी संध्याकाळी या पुलावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराची दुचाकी पुलावरील खड्ड्यात आदळल्याने पुलाच्या तुटलेल्या कठड्यावरून तो दुचाकीसह थेट खाडीच्या पाण्यात पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन विभागाला दिली.

Maharashtra Times 22 Jul 2018, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kalyan-accident


कल्याणचा ब्रिटिशकालीन पत्रीपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असला तरी नव्या दुर्गाडी पुलावर नेहमी असणाऱ्या वाहतूककोंडीमुळे दुचाकीस्वार आजही या बंद केलेल्या जुन्या पुलाचा वापर करतात. शनिवारी संध्याकाळी या पुलावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराची दुचाकी पुलावरील खड्ड्यात आदळल्याने पुलाच्या तुटलेल्या कठड्यावरून तो दुचाकीसह थेट खाडीच्या पाण्यात पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन विभागाला दिली.

यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी या दुचाकीस्वाराचा खाडीच्या पाण्यात शोध सुरू केला, मात्र तो किंवा त्याची दुचाकी कुठेही आढळून न आल्याने संध्याकाळी सातच्या सुमारास अग्निशमन विभागाने शोधकार्य थांबविले. दुचाकीस्वार पाण्यात पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली असली तरी याबाबत अधिकृत तक्रार करण्यासाठी कोणीही आलेला नसल्यामुळे केवळ ऐकीव माहितीच्या आधारेच अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांचे शोधकार्य सुरू असल्याचे अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज