अ‍ॅपशहर

काळ्या जादूसाठी ७० लाखांच्या मांडुळाची विक्री, कल्याणमध्ये पोलिसांची धडक कारवाई

काळी जादू करण्यासाठी ७० लाखांचा मांडूळ साप विकणाऱ्या टोळीला कल्याणच्या डीसीपी स्कॉडने अटक केली आहे. या टोळीत पाच जणांचा समावेश आहे. पाच आरोपींसह पोलिसांनी मांडूळ साप जप्त केला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Aug 2022, 5:16 pm
कल्याण: काळी जादू करण्यासाठी ७० लाखांचा मांडूळ साप विकणाऱ्या टोळीला कल्याणच्या डीसीपी स्कॉडने अटक केली आहे. या टोळीत पाच जणांचा समावेश आहे. पाच आरोपींसह पोलिसांनी मांडूळ साप जप्त केला आहे. या टोळीने आणखी किती लोकांना मांडूळ साप विकले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mandul snake
पोलिसांनी जप्त केला मांडूळ साप


पालघर येथे राहणारे काही जण मांडूळ साप विकण्यासाठी कल्याणला येणार असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांना मिळाली होती. यानंतर डीसीपी स्कॉडचे संजय पाटील, ऋषिकेश भालेराव, सदाशिव देवरे यांच्यासह पथकाने रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अग्रवाल कॉलेजजवळ सापळा रचला. तीन दुचाकीवरून पाच जण येताना पोलिसाना दिसले. डीसीपी स्कॉडच्या पथकाला संशय आल्याने त्यांनी या पाच जणांना थांबवलं. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे मांडूळ साप आढळला .

महत्वाचे लेख