अ‍ॅपशहर

माणुसकीला काळिमा! अल्पवयीन कातकरी मुलांकडून वेठबिगारी; दोघांविरोधात तक्रार दाखल

या दोन्ही प्रकरणात वेठबिगारी कायद्याचे उल्लंघन झालेच, परंतु अल्पवयीन मुलांकडून काम करून घेण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने पडघा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 21 Sep 2022, 11:44 am
ठाणे : भिवंडी तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या कातकरी कुटुंबातील दोन मुलांना किरकोळ मोबदल्यात वेठबिगारी करण्यास भाग पाडणाऱ्या मेंढपाळांविरोधात पडघा पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vethbigari.
अल्पवयीन कातकरी मुलांकडून वेठबिगारी


पडघ्याजवळील सागपाडा-वाफाळे येथील १२ वर्षांच्या मुलास अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या ढवलपुरी येथील मेंढपाळ संभाजी खताळ याने दीड वर्षांपूर्वी ५०० रुपये महिना वेतनावर मेंढ्या राखण करण्यासाठी नेले. अधून मधून त्याला घरी सोडले जाई. त्यासोबत कधी हजार तर कधी दीड हजार रुपये कुटुंबीयांना देण्यात आले. मात्र त्या व्यतिरिक्त कोणताही मोबदला देण्यात आला नाही, अशी तक्रार त्याच्या आईने नोंदवली आहे. दुसऱ्या घटनेत भिवंडी तालुक्यातील वडवली खोताचा पाडा येथील १७ वर्षीय कातकरी मुलास अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील भिवा गोयकर या मेंढपाळाने ५०० रुपये महिना मोदबला देण्याचे कबूल करून मेंढ्यापालन करायला नेले. तिथे त्याला चांगली वागणूक मिळाली नसल्याने तो घरी आला. या दोन्ही प्रकरणात वेठबिगारी कायद्याचे उल्लंघन झालेच, परंतु अल्पवयीन मुलांकडून काम करून घेण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने पडघा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

महत्वाचे लेख