अ‍ॅपशहर

मुलींची हत्या करणाऱ्या महिलेला जन्मठेप

पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर बँकेचे भले मोठे कर्ज असल्याच्या नैराश्यातून एका महिलेने पोटच्या दोन मुलींना विष देऊन हत्या केली. त्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न असताना तिचा आत्महत्येचा प्रयत्न फसला होता. ४ नोव्हेंबर २००५ साली घडलेल्या या प्रकरणात या महिलेवर गुन्हा दाखल झाला होता.

Maharashtra Times 11 Feb 2018, 12:16 am
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jail


पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर बँकेचे भले मोठे कर्ज असल्याच्या नैराश्यातून एका महिलेने पोटच्या दोन मुलींना विष देऊन हत्या केली. त्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न असताना तिचा आत्महत्येचा प्रयत्न फसला होता. ४ नोव्हेंबर २००५ साली घडलेल्या या प्रकरणात या महिलेवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी जिना बाळकृष्ण अग्रवाल हिला दोषी ठरवून जन्मठेपेची आणि ५ हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरीक्त न्यायाधीश पी. आर. कदम यांनी ही शिक्षा ठोठावली.

कापूरबावडी परिसरात राहणाऱ्या जिना अग्रवाल (४५) या भिवंडीत राष्ट्रीयकृत बँकेत लिपिक म्हणून काम करीत होत्या. तर पती बाळकृष्ण हे व्यावसायिक होते. सप्टेंबर २०१४ च्या दरम्यान बाळकृष्ण यांचे अपघातात निधन झाले. पदरी दोन मुली आणि पतीने बँकेतून घेतलेले भले मोठे कर्ज यामुळे नैराश्येतून जिना यांनी आपल्या मुली सृष्टी (७) आणि मुक्ती (२) यांना झोपेच्या गोळ्या देऊन त्यांची हत्या केली. त्यानंतर, स्वतःही झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येपूर्वी जिना यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरूनच कापूरबावडी पोलिसांना दोन मुलींच्या हत्येचे कारण कळल्याने पोलिसांनी तिला अटक केली. हे प्रकरण, अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. कदम यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी आले होते. वकिलांनी न्यायालयात १७ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यानुसार,सबळ पुरावे, आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी आणि साक्षीदारांच्या साक्ष ग्राह्य धरीत आरोपी जिना अग्रवाल याना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज