अ‍ॅपशहर

एक्स्प्रेसच्या धडकेने लोको पायलटचा मृत्यू

सायडिंगला उभ्या करून ठेवलेल्या एक्स्प्रेसच्या इंजिनची तपासणी करण्यासाठी रेल्वेमधून उतरलेल्या लोको पायलटला बाजूच्या रुळांवरून जाणाऱ्या एक्स्प्रेसने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी बोईसर स्थानकात घडली.

Maharashtra Times 25 Oct 2017, 4:00 am
पालघर : सायडिंगला उभ्या करून ठेवलेल्या एक्स्प्रेसच्या इंजिनची तपासणी करण्यासाठी रेल्वेमधून उतरलेल्या लोको पायलटला बाजूच्या रुळांवरून जाणाऱ्या एक्स्प्रेसने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी बोईसर स्थानकात घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम loco pilot dead in express accident
एक्स्प्रेसच्या धडकेने लोको पायलटचा मृत्यू


बोईसर रेल्वे स्थानकात लोको पायलट उमेशचंद्र यांनी १९०१७ डाऊन सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस साय‌ड‌िंगला उभी केली होती. संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास उमेशचंद्र हे इंजिनच्या बाजूने पाहणी करत होते, इतक्यात बाजूच्या रुळांवरून जाणाऱ्या २२५९३ मुंबई – ऑगस्ट क्रांती या जलद गाडीखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. उमेशचंद्र हे वलसाड मुख्यालयाचे लोको पायलट होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज