अ‍ॅपशहर

बोलण्यात गुंतवून लुबाडले

म टा वृत्तसेवा, ठाणेनौपाड्यात शनिवारी सकाळी सुरेश ठिकरूळ (५९ रा...

Maharashtra Times 10 Sep 2018, 4:00 am

म. टा वृत्तसेवा, ठाणे

नौपाड्यात शनिवारी सकाळी सुरेश ठिकरूळ (५९ रा. ऐरोली) यांना दोघा भामट्यांनी बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आदी मुद्देमाल लांबवल्याची घटना घडली. या दोघा भामट्यांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठिकरुळ हे आईच्या घरी पायी निघाले होते. त्यावेळी भामटे त्यांच्याजवळ आले आणि डोळ्यांचा दवाखाना कोठे आहे, अशी त्यांच्याकडे विचारणा केली. तसेच, तुमच्याकडील सर्व दागिने आणि इतर वस्तू रुमालात काढून ठेवा, असेही भामट्यांनी सांगितले. अशा पद्धतीने भामट्यांनी ठिकरूळ यांच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल फसवणूक करून लंपास केला आहे. आरोपी ४० ते ४५ वर्षे वयोगटातील असून नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज