अ‍ॅपशहर

एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?, ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वेट अँड वॉच

शिवसेनेचे नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सर्व लक्ष शिंदेंच्या निर्णयाकडे लागले आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2022, 9:34 pm
डोंबिवली : राज्यातील राजकारणातील घडामोडींनंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे काय निर्णय घेतात याकडे ठाणे जिल्ह्यातील विविध पालिकेतील नगरसेवक तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे वाटपाहत आहेत. तसेच आपण काय निर्णय घ्यायचा यासाठी वेट अँड वॉची भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra political crisis eknath shinde shiv sena in surat
एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?, ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वेट अँड वॉच


दुसरीकडे महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप आणि मनसेतून इंनकमिग केलेले माजी नगरसेवक पदाधिकारी यांची गोची झाली आहे. तर शिवसेना भाजपची जवळीक न पटल्याने मनसेतून शिवसेनेत गेलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गोची झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

एकीकडे मुबंई आणि राज्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना कार्यकर्ते निषेध करत आहेत. त्यांच्या विरोधात निदर्शने केला जात आहेत. ही स्थिती मात्र ठाणे जिल्ह्यात दिसत नाहीये. कारण एकच, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबदबा. कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातील इतर पदाधिकारी सर्व राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

कल्याणमध्ये राडा!, शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; भाजपचे माजी आमदार बोलले...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज