अ‍ॅपशहर

माथेरान मिनीबससाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे सुरू असलेल्या मिनीबसच्या जागी नव्या बस देण्याच्या मागणीसाठी माथेरान येथील विद्यार्थ्यांनी कर्जत एसटी आगारात काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. १०जूनपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला.

Maharashtra Times 26 May 2016, 3:00 am
उरण : रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे सुरू असलेल्या मिनीबसच्या जागी नव्या बस देण्याच्या मागणीसाठी माथेरान येथील विद्यार्थ्यांनी कर्जत एसटी आगारात काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. १०जूनपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra/thane/matheran
माथेरान मिनीबससाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन


आठ वर्षांपासून माथेरानच्या रहिवाशांसाठी कर्जत ते माथेरानदरम्यान मिनीबस सेवा सुरू करण्यात आली आहे. याचा, माथेरान येथे येणाऱ्या पर्यटक, विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांना फायदा झाला. तसेच माथेरान येथे मनमानीपणे पैसे आकारणाऱ्या टॅक्सीचालकांवर वचक निर्माण झाला होता. परंतु, सुमारे दीड वर्षापासून ही मिनीबस माथेरानच्या घाटात बंद पडण्याच्या अनेक घटना घडल्याने विद्यार्थी आणि रहिवाशांचे हाल होत आहेत. त्यातच, कर्जत ते माथेरान दरम्यान दिवसागणिक पाच फेऱ्या असणाऱ्या गाड्यांची संख्या रोडावली असून ही संख्या आठवड्यातून अवघ्या दोन फेऱ्यांवर आली आहे. यामुळे, माथेरान येथून नेरळ, कर्जत, कल्याण येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. अखेर संतप्त झालेल्या प्रवाशांनी बुधवारी आंदोलन केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज