अ‍ॅपशहर

माथेरानमध्ये ६ माकडांचा तडफडून मृत्यू, विषप्रयोगाचा संशय, स्थानिकांमधून हळहळ व्यक्त

Matheran Monkey Death News : माथेरान म्हटलं की मिनी ट्रेन आणि तिथली माकडंही आलीच. माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या माकडांना बघितलं असेल. पण या माकडांसोबत एक दुर्दैवी घटना घडली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jun 2023, 10:54 am
माथेरान : मुंबई जवळचे पर्यटकांचे आकर्षण स्थळ म्हणजे माथेरान. सुट्टीच्या दिवसांमध्ये माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी होते. माथेरान आणि माकडं हे एक समीकरणच आहे. माथेरानच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे माकडं. असे असताना माथेरानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी काही माकडांचा तडफडून मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Matheran Monkey Dead
माथेरान मध्ये माकडांचा मृत्यू....


माकडांचा तडफडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यावर स्थानिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. माथेरान रेल्वे स्टेशन परिसरात सकाळच्या दरम्यान सात ते आठ लहान मोठी माकडं बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. एकूण आठ माकडांपैकी दोन माकडं तडफडत होती. तर उर्वरीत सहा माकडं आधीच मृत्यूमुखी पडलेली होती.

चार कोयते हातात घेऊन व्हिडिओ काढला, सोशल मीडियावर पोस्टही केला; त्यानंतर जे झालं...
तडफडत असलेल्या दोन माकडांना स्थानिक नागरिकांनी पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही इलाज होऊ शकला नाही. रात्रीच्या वेळी या माकडांवर कुणी विष प्रयोग तर केला नाही ना? असा सवाल उपस्थिती केला जात आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या उष्णता वाढली असून उष्माघातामुळे ही माकडं दगावली का? की अन्य काही कारणांमुळे यांचा मृत्यू झाला आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


दरम्यान, मृत्यू पावलेल्या माकडांना वनखात्याच्या अधिकारी वर्गाने शवविच्छेदन करण्यासाठी नेले आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर ह्या माकडांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला आहे हे उघडकीस येईल. या माकडांच्या मृत्यूमुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाचे लेख