अ‍ॅपशहर

पाहा, ही क्रूरता तुमच्या अंगावर काटा आणेल!

दुकानदाराशी वाद झाल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने एका २८ वर्षीय मनोरुग्ण तरूणाला बेदम मारहाण केली. क्रोर्याचा कळस म्हणजे या जमावाने त्याला झाडाला लटकावून अमानूषपणे मारहाण केली. दोन पोलीस घटनास्थळी आल्यानंतरही जमाव त्याला मारत होता. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला.

Maharashtra Times 2 Nov 2017, 3:10 pm
मटा ऑनलाइन वृत्त । ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mentally unstable man beaten to death in thane
पाहा, ही क्रूरता तुमच्या अंगावर काटा आणेल!


दुकानदाराशी वाद झाल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने एका २८ वर्षीय मनोरुग्ण तरूणाला बेदम मारहाण केली. क्रोर्याचा कळस म्हणजे या जमावाने त्याला झाडाला लटकावून अमानूषपणे मारहाण केली. दोन पोलीस घटनास्थळी आल्यानंतरही जमाव त्याला मारत होता. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला.

ही मारहाण सुरू असताना घटनास्थळी पोहचलेल्या दोन्ही पोलिसांनी या तरूणाला फारसा वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे जमावाला बळ मिळालं आणि ते या तरुणाला मारतच सुटले, असं सुत्रांनी सांगितलं. दरम्यान, या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.

पाहा व्हिडिओ:

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज