अ‍ॅपशहर

मीटर रीडिंग होणार बिनचूक

महावितरणच्या मीटर रीडिंग यंत्रणेमधल्या चुका दूर व्हाव्यात आणि ग्राहकांना योग्य वीजबिले मिळावीत, यासाठी महावितरणद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत. महावितरणद्वारे कंत्राटी पद्धतीवर नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Maharashtra Times 20 Mar 2017, 3:00 am
महावितरण करणार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम meter reading in kalyan dombivali will be errorfree
मीटर रीडिंग होणार बिनचूक


आदित्य बिवलकर, डोंबिवली

महावितरणच्या मीटर रीडिंग यंत्रणेमधल्या चुका दूर व्हाव्यात आणि ग्राहकांना योग्य वीजबिले मिळावीत, यासाठी महावितरणद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत. महावितरणद्वारे कंत्राटी पद्धतीवर नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर सहज करता येईल, अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक या कामासाठी करण्यात येणार असून यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मीटर रीडिंगमध्ये झालेल्या चुकांमुळे बऱ्याचवेळा ग्राहकांना चुकीची वीजबिले पाठविण्यात येत आहेत. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे महावितरणवर ग्राहकांद्वारे टीका करण्यात येत आहे. त्यामुळे मीटर रीडिंगमधील गोंधळ कमी करण्यासाठी नवीन नेमणुका करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोबाइल अॅपचा वापर सहज करता येईल आणि अधिक योग्य प्रकारे रीडिंग घेता येईल, अशा अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांना मोबाइलद्वारे रीडिंग करण्यात अडथळा येत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मोबाइलद्वारे करण्यात येणाऱ्या या रीडिंगची सवय नसल्याने जुन्या अधिकाऱ्यांना याप्रकाराने रीडिंग घेता येत नाही आणि त्यामुळे तांत्रिक चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे पारदर्शी रीडिंग घेता यावे आणि योग्य पद्धतीने बिले ग्राहकांना मिळावीत, या हेतूने नवीन नेमणुका करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सध्याच्या अधिकाऱ्यांना मोबाइलद्वारे घेण्यात येणाऱ्या रीडिंगमध्ये वेळ लागत असल्यामुळे काही वेळा बिलेसुद्धा उशिराने पोहोचतात. म्हणूनच या नवीन पद्धतीने मोबाइल रीडिंग वेगाने घेण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. त्याचा फायदा ग्राहकांना मिळेल आणि जलदगतीने बिले ग्राहकांपर्यंत पोहोचतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नवीन नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याला महावितरणकडून दुजोरा मिळाला आहे. कल्याण झोनसाठी निविदासुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

जलदगतीने वीजबिले पोहोचणार

एजन्सीद्वारे करण्यात येणाऱ्या वसुलीबद्दल महावितरणकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मीटर रीडिंगबद्दलसुद्धा ग्राहकांकडून तक्रारी मांडण्यात आल्या आहेत. त्याचीच दखल घेत महावितरणच्या वतीने नवीन नियुक्ती करण्यात येणार आहे. दर महिन्याला एका कर्मचाऱ्याद्वारे ३७,००० वीजबिल मीटर्सचे रीडिंग करण्यात येणार आहे. या माध्यमातून वीजबिलेसुद्धा अधिक जलदगतीने ग्राहकांना मिळण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याचबरोबर एसएमएसद्वारे बिल पाठवण्यात येणार आहेत. नियुक्तीनंतर रितसर प्रशिक्षण देऊन अंतिम निवड करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज