अ‍ॅपशहर

दूध आणणारी रेल्वे रद्द

मुंबईला दूधपुरवठा करण्यासाठी गुजरातमधून साडेचार लाख लिटर दूध १२ डब्यांच्या रेल्वेमधून आणण्यात येणार होते...

Maharashtra Times 19 Jul 2018, 4:00 am

पालघर : मुंबईला दूधपुरवठा करण्यासाठी गुजरातमधून साडेचार लाख लिटर दूध १२ डब्यांच्या रेल्वेमधून आणण्यात येणार होते. मात्र ही माहिती मिळताच राजू शेट्टी यांनी आपला मोर्चा डहाणू रोड रेल्वे स्टेशनकडे वळवला आणि तिथे आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे दूध घेऊन येणारी गाडीच रद्द करण्यात आली.

मुंबईकरांना आजही दिलासा

मुंबई : आंदोलनाच्या चौथ्या दिवसापासून मुंबईकरांना दूध तुटवड्याचा फटका बसेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता आज, गुरुवारीही दूधदिलासा मिळाला आहे. कोल्हापूरमध्ये पूर आल्याने तिथून होणाऱ्या दूध वितरणावर परिणाम झाला आहे तरी ज्या डेअरींकडून दूध कमी आले आहे त्या वितरकांपर्यंत अमूल दूध पोहोचले आहे.

वृत्त...६

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज