अ‍ॅपशहर

लाखो रुपयांच्या सिगारेटचा अपहार

परदेशात निर्यात करण्यात येणाऱ्या सिगारेटच्या मालाचा अपहार करणाऱ्या आंतरराज्य टोळीला ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने अटक केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी ४५ लाख ८३ हजार रुपायांचे सिगारेट तसेच ट्रेलर, ट्रक असा एकूण ६८ लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Maharashtra Times 25 Apr 2018, 5:00 am
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime


परदेशात निर्यात करण्यात येणाऱ्या सिगारेटच्या मालाचा अपहार करणाऱ्या आंतरराज्य टोळीला ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने अटक केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी ४५ लाख ८३ हजार रुपायांचे सिगारेट तसेच ट्रेलर, ट्रक असा एकूण ६८ लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

विजय यादव (३५), अलोक अग्रवाल (३८), अखील अहमद कलफू खान (२८), मोहमद इस्माईल मो. सलीन साह (३९), शिवधारी यादव (५०), रमाशंकर शर्मा (३०), प्रविणकुमार सिंग (३६), बिलाल अहमद मोहमद जब्बार अहमद (२८), मोहमद जलालउद्दीन मोहमद नदाम खान अशी या अटक आरोपींची नावे आहेत. मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने उत्तरशिव नाका येथून ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये १५ लाख ४९ हजार ९३८ रुपयांचे सिगारेटचे एकूण १८६ खोकी आढळली होती. यावेळी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत चौकशी केली असता, आरोपींनी अन्य साथीदारांच्या मदतीने कंटेनरमधून परस्पर मोठ्या प्रमाणावर सिगारेट काढले आणि त्याची विक्री करण्यासाठी आरोपी उत्तरशिवमध्ये आल्याची बाब पुढे आली. त्यासाठी कंटेनर चालक विजय यादव हाताशी धरले होते. रांजणगाव एमआयडीसीमधील आयटीसी कंपनीतून सिगारेटचा माल कंटेनरमध्ये भरल्यानंतर हा कंटेनर जेएनपीटी न्हावाशिवा येथे निघाला होता. तेथून सिगारेटचा हा माल सौदी अरेबियामध्ये निर्यात करण्यात येणार होता. परंतु आरोपींनी खालापूर येथे चौक फाटा येथे कंटेनर थांबवून कंटेनरमधून सिगारेटचे ५५० खोकी काढली. कंटेनरमध्ये एकूण १ हजार ५० खोकी होती. याप्रकरणी शिळडायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ९ जणांच्या टोळीला अटक केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज