अ‍ॅपशहर

मनसेचा आंदोलनाचा इशारा

पालिका शाळा सुरू होऊन तीन आठवडे उलटले असतानाही महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Maharashtra Times 4 Jul 2017, 3:00 am
उल्हासनगर : पालिका शाळा सुरू होऊन तीन आठवडे उलटले असतानाही महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महापालिकेने येत्या आठ दिवसांत हे वाटप न केल्यास महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mns warns to protest for education material
मनसेचा आंदोलनाचा इशारा


उल्हासनगरमधील आरटीईअंतर्गत प्रवेशास पात्र असणाऱ्या शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही नियमाप्रमाणे शाळा प्रशासनाने शालेय साहित्य व गणवेश मोफत द्यायचे आहेत. परंतु उल्हासनगरमधील काही शाळा या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश देण्यास टाळाटाळ करत आहेत. या शाळांना मनविसेकडून शालेय साहित्य व गणवेशाच्या वाटपासाठी आठ दिवसांची मदत देण्यात आली. जर या शाळांनी आठ दिवसांत या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश दिले नाहीत, तर महानगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनविसेचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष बंडू देशमुख व उल्हासनगर शहर अध्यक्ष मनोज शेलार यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज