ठाणे : रिक्षाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत विशाल सोंडकर (२५, रा. नौपाडा) जखमी झाला असून हा अपघात बुधवारी रात्री गोखले रोडवर घडला आहे. रिक्षाचालकाविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल याच्या मोटारसायकलच्या पुढच्या भागास रिक्षाने धडक दिली होती. नंतर रिक्षाचालक पळून गेला. या धडकेने विशाल खाली पडल्याने गुडघ्याला तसेच हनुवटीस मार लागला आहे. शिवाय मोटारसायकलचेदेखील नुकसान झाले आहे. नौपाडा पोलिस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.
रिक्षाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी
रिक्षाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत विशाल सोंडकर (२५, रा नौपाडा) जखमी झाला असून हा अपघात बुधवारी रात्री गोखले रोडवर घडला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Aug 2019, 4:00 am