अ‍ॅपशहर

भाईंदर: ट्रेनखाली जाणाऱ्या प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी वाचवले

भाईंदर रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या प्रवाशाचे सतर्क रेल्वे पोलिसांनी प्राण वाचवले. अनिल साहनी असं प्रवाशाचं नाव आहे. दादरच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या ट्रेनमध्ये तो चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी पाय घसरून तो ट्रेन आणि फलाटामधील पोकळीत पडला. दोन रेल्वे पोलिसांनी त्याला तात्काळ बाहेर खेचले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jun 2019, 11:36 am
ठाणे:

भाईंदर रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या प्रवाशाचे सतर्क रेल्वे पोलिसांनी प्राण वाचवले. अनिल साहनी असं प्रवाशाचं नाव आहे. दादरच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या ट्रेनमध्ये तो चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी पाय घसरून तो ट्रेन आणि फलाटामधील पोकळीत पडला. दोन रेल्वे पोलिसांनी त्याला तात्काळ बाहेर खेचले. हा सर्व थरार फलाटावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बोरिवलीतील रहिवासी अनिल साहनी या तरुणानं शुक्रवारी भाईंदर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ६ वरून दादरकडे जाणारी धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा तोल गेला. तो ट्रेन आणि फलाटाच्या पोकळीत पडला. त्याचवेळी रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल संजय सिंह आणि महेंद्र जाधव यांनी अनिलला बाहेर खेचले. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळं त्याचे प्राण वाचले. या अपघातात अनिल किरकोळ जखमी झाला. रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज