अ‍ॅपशहर

विक्रोळीतील कोल्हा पकडण्यात ‘रॉ’ला यश

विक्रोळीतील गोदरेज परिसरात फिरणाऱ्या जखमी कोल्ह्याला पकडण्यात ठाण्यातील 'रॉ' अर्थात 'रेस्क्युइंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' संस्थेला यश आले आहे. उपचारानंतर या कोल्ह्याला ठाणे वनविभागाच्या ताब्यात दिले जाणार आहे.

Maharashtra Times 31 Mar 2018, 12:24 pm
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fox


विक्रोळीतील गोदरेज परिसरात फिरणाऱ्या जखमी कोल्ह्याला पकडण्यात ठाण्यातील 'रॉ' अर्थात 'रेस्क्युइंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' संस्थेला यश आले आहे. उपचारानंतर या कोल्ह्याला ठाणे वनविभागाच्या ताब्यात दिले जाणार आहे.

विक्रोळीतील गोदरेज वसाहतीतील खाडी कॉलनी या भागात कोल्हे दिसण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढत आहे. नागरिकांकडून सातत्याने याबाबत तक्रारी केल्या जातात. याच परिसरातून आतापर्यंत चार कोल्ह्यांना ताब्यात घेऊन वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुन्हा एकदा परिसरात कोल्हा दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या वसाहतीतील एका झाडाखाली सावलीत हा कोल्हा बसलेला काही सुरक्षा रक्षकांना दिसला. त्याबाबत त्यांनी संस्थेला माहिती दिली. या कोल्ह्याच्या पायाला जखम झाल्याचे तेथे आलेल्या संस्थेच्या सदस्यांच्या निदर्शनास आले. पुढील उपचारांसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत संस्थेतर्फे ठाणे वनविभागाला माहिती देण्यात आली असून उपचारानंतर हा कोल्हा वनविभागाच्या ताब्यात दिला जाणार असल्याचे 'रॉ' संस्थेच्या पवन शर्मा यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज