अ‍ॅपशहर

ग्रामस्थांना विश्वासात घेऊन जेट्टीचे काम

पालघर तालुक्यातील नांदगाव येथील जेट्टीचे काम स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत दिले.

Maharashtra Times 28 Jul 2016, 1:14 am
मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nandgaon jetty
ग्रामस्थांना विश्वासात घेऊन जेट्टीचे काम


म. टा. वृत्तसेवा, पालघर

पालघर तालुक्यातील नांदगाव येथील जेट्टीचे काम स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत दिले.

तारापूर जवळील नांदगाव येथील प्रस्तावित जेट्टी तयार झाल्यास महाराष्ट्र हा देशामध्ये जास्त मालवाहतूक करणारे राज्य ठरू शकेल, मात्र असे करताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय या संदर्भातील कोणतेही काम केले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रशनला उत्तर देताना दिली.

प्रस्तावित जेट्टीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याबाबतचा प्रश्न विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील व मनीषा चौधरी यांनी या संदर्भातला प्रश्न विचारला होता.

फडणवीस म्हणाले २०११ ते २०१४ या काळात या प्रस्तावित जेट्टीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. तर या वर्षी केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागानेही परवानगी दिली आहे. मात्र असे असले तरी याबाबत येथील स्थानिकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे सदर प्रकरण आता राष्ट्रीय हरित लावादाकडे न्यायप्रविष्ट आहे. नांदगाव जेट्टी आणि वाढवण बंदर यासंदर्भात राज्य शासनामार्फत अभ्यास करण्यात येत आहे. सदर प्रस्तावित जेट्टी उभारण्याचे काम राज्य शासन आणि शिपिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सदर जेट्टी तयार करताना येथील स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या शंकांचे निरसन करूनच काम केले जाईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज