अ‍ॅपशहर

प्रतीक्षा दिवाळी पहाटेची!

वसई तालुक्यात दिवाळीचा माहोल तयार झाला आहे. धक्याच्या दुलईत लपटलेल्या पहाटेच्यावेळी थंडीही जाणवू लागली आहे. अशा आल्हाददायक वातावरणात दिवाळीच्या स्वागतासाठी सर्वच जण सज्ज झाले असून ‘दिवाळी पहाट’ व ‘पहिल्या आंघोळी’च्या प्रतीक्षेत आता सर्व आहेत.

Maharashtra Times 28 Oct 2016, 1:18 am
मयुरेश वाघ, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no deepavali celebration
प्रतीक्षा दिवाळी पहाटेची!


वसई तालुक्यात दिवाळीचा माहोल तयार झाला आहे. धक्याच्या दुलईत लपटलेल्या पहाटेच्यावेळी थंडीही जाणवू लागली आहे. अशा आल्हाददायक वातावरणात दिवाळीच्या स्वागतासाठी सर्वच जण सज्ज झाले असून ‘दिवाळी पहाट’ व ‘पहिल्या आंघोळी’च्या प्रतीक्षेत आता सर्व आहेत.

दिवाळी पहाट, दिवाळी संध्या अशा कार्यक्रमांचे आयोजन शहरात केले गेले आहे. दिवाळी असल्याने प्रत्येकाची खरेदीसाठी व दिवाळीच्या तयारीची लगबग सुरू आहे. बाजारपेठा व मॉल गर्दीने फुलून गेले आहेत.

दिवाळी पहाट, दिवाळी संध्या अशा कार्यक्रमांचे आयोजन विरार, नालासोपारा,वसई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमुळे वसईकरांची दिवाळी पहाट संगीतमय होणार आहे. विरार पश्चिमेला बायपास रस्त्याजवळ असलेल्या वृक्ष नक्षत्र व वनस्पती उद्यानात ज्येष्ठ नागरिकांकडून आज शुक्रवारी सकाळी ७ वाजता दिवाळी पहाट कार्यक्रम होणार असून हे ज्येष्ठ नागरिक स्वत: आपली गाणी सादर करणार आहेत. वसई-विरार पालिका प्रभाग समिती ‘आय’तर्फे दिवाळी संध्या ‘गंधार’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळ, अनंतराव ठाकूर सभागृह,पारनाका वसई येथे हा कार्यक्रम होणार असून त्यात जुन्या-नव्या मराठी गीतांचे सादरीकरण गायक करणार आहेत.

शिवसेना वसई तालुका शाखेतर्फे दिवाळी संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता वसईतील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर हा कार्यक्रम होणार असून सर्वधर्म स्नेहमीलनही होणार आहे. विरारच्या यंग स्टार्स ट्रस्टच्या वतीने विरारमध्ये दिवाळी पहाट व दिवाळी संध्या कार्यक्रम होणार आहे. पालिकेच्या वतीने शनिवार २९ ऑक्टोबर रोजी माणिकपूर येथील वाय.एम.सी.ए. हॉलमध्ये पहाटे ५.३० वाजता ‘दीपोत्सव’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

बविआ व गेट टुगेदर ग्रुप यांच्यातर्फे संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रम ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता श्रीप्रस्थ चौथा रोड,बविआ भवन,एचपी पेट्रोल पंपाच्या बाजूला,नालासोपारा पश्चिम येथे होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज