अ‍ॅपशहर

पालिकेच्या पार्किंगला मुहूर्त मिळेना

शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहनांमुळे वाहतूककोंडीही वाढत आहे. त्यामुळे वाढत्या वाहनांमुळे शहरात पार्किंगचा प्रश्नही गंभीर होत आहे. वाहनतळाअभावी स्टेशन आणि रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त वाहने पार्क करण्यात येत असून, मागील दिड वर्षापासून पालिकेच्या वाहनतळाचा प्रश्न रखडला आहे. वाहनतळाच्या कंत्राटदाराला पुन्हा अखेरची मुदत वाढ देण्यात आली आहे.

Maharashtra Times 7 Nov 2016, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, बदलापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no parking in badlapur
पालिकेच्या पार्किंगला मुहूर्त मिळेना


शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहनांमुळे वाहतूककोंडीही वाढत आहे. त्यामुळे वाढत्या वाहनांमुळे शहरात पार्किंगचा प्रश्नही गंभीर होत आहे. वाहनतळाअभावी स्टेशन आणि रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त वाहने पार्क करण्यात येत असून, मागील दिड वर्षापासून पालिकेच्या वाहनतळाचा प्रश्न रखडला आहे. वाहनतळाच्या कंत्राटदाराला पुन्हा अखेरची मुदत वाढ देण्यात आली आहे.

बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र लोकसंख्येसोबत वाढत्या वाहनांच्या पार्किंगसाठी कोणतीही उपाययोजना पालिका प्रशासनाकडून करण्यात येत नसल्याने स्टेशन परिसरात पार्किंगचा प्रश्नही आता गंभीर झाला आहे. या बेशिस्त पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बदलापूर नगरपालिकेने वाहनतळाच्या समायोजित आरक्षणांतर्गत पश्चिमेला महादेव मंगल कार्यालयामागे आणि पूर्वेला उड्डाणपुलाच्या बाजूला वाहनतळ उभारले आहे. प्राथमिक सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळे वाहनतळाच्या कंत्राटदाराने वाहनतळाचा ताबा घेण्याचे टाळले होते. मात्र आता कंत्राटदाराने पालिकेकडे कराराची रक्कम जमा केली आहे. मात्र तरीही ताबा न घेतल्याने हा विषय पालिकेच्या विशेष सभेत चर्चेला आला होता. त्यावेळी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी कंत्राटदाराला आठवडाभराची वाढीव मुदत देत कंत्राटदाराने वाहनतळाचा ताबा न घेतल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे लवकरच वाहनतळ खुले होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज