अ‍ॅपशहर

प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसी नजर

पोलिस स्टेशन म्हटले की तक्रारदारांना नेहमीच वाईट अनुभवास सामोरे जावे लागत असते. मात्र परिमंडळ चारमध्ये सध्या प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये स्वागत कक्ष उभारण्यात आले असून तक्रारदारांना येथून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच, सर्व पोलिस स्टेशनांमध्ये लवकरच पेट्रोलिंगसाठी हायटेक इर्टिगाही दाखल होणार असून, परिमंडळ चारमधील गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी ‘वन कॉप वन क्रिमिनल’ या योजनेंतर्गत ५०० आरोपींवर रोज नजर ठेवण्यात येत आहे.

Maharashtra Times 20 May 2017, 3:00 am
परिमंडळ ४मध्ये ‘वन कॉप, वन क्रिमिनल’ योजना ; सर्वसामान्यांसाठी स्वागतकक्षही सज्ज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one cop one criminal scheme in parimandal 4 police station
प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसी नजर


म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ

पोलिस स्टेशन म्हटले की तक्रारदारांना नेहमीच वाईट अनुभवास सामोरे जावे लागत असते. मात्र परिमंडळ चारमध्ये सध्या प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये स्वागत कक्ष उभारण्यात आले असून तक्रारदारांना येथून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच, सर्व पोलिस स्टेशनांमध्ये लवकरच पेट्रोलिंगसाठी हायटेक इर्टिगाही दाखल होणार असून, परिमंडळ चारमधील गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी ‘वन कॉप वन क्रिमिनल’ या योजनेंतर्गत ५०० आरोपींवर रोज नजर ठेवण्यात येत आहे.

पोलिस स्टेशनमध्ये एखादी तक्रार करण्यासाठी गेलेल्या सामान्य नागरिकाला वाईट अनुभव आल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यात एखाद्या कामासाठी कोणत्या साहेबांना भेटायचे, कोणत्या विभागात जायचे याचेही योग्य मार्गदर्शन पोलिसांकडून होत नसते. त्यामुळे पोलिस विभागाच्या कारभारावर नेहमीच टीका केली जाते. मात्र पोलिस आयुक्त परमबिर सिंग, अतिरिक्त आण‌ि सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर नागरिकांना वाईट अनुभवाऐवजी समाधान मिळावे यासाठी योजना आखण्यात आली आहे. या योजनेची परिमंडळ चारमध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेत परिमंडळ चारमधील सर्व पोलिस स्टेशनमध्ये प्रावेशद्वाराजवळच महिला पोलिस कर्मचारी असलेले स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. पोलिस स्टेशनमध्ये आलेल्या नागरिकाला येथून योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. कोणत्या तक्रारीसाठी कुणाला भेटायचे, याबाबतही सांगितले जाणार आहे. तसेच ‘वन कॉप वन क्रिमिनल’ या योजनेंतर्गत शहरातील सर्व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक आरोपीमागे एका पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार तो पोलिस रोज त्या गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या रोजच्या हालचालींवर नजर ठेवणार आहे. त्याच्या घरी आणि कामाच्या ठिकाणी भेट देत त्याची रोज डायरीत नोंद करणार आहे. याबाबत रोज वरिष्ठ पोलिसांकडे तो अहवाल सादर केला जाणार आहे. परिमंडळ चारमधील एकूण ५०० आरोपींसाठी पाचशे पोलिसांवर या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे रोज पोलिसांची आरोपींवर नजर असल्याने शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्याची मदत होईल, असे परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सुनिल भारद्वाज यांनी सांगितले.

पोलिस स्टेशनमध्ये पासपोर्ट तसेच विवरणपत्र यासाठी गेलेल्या नागरिकांनाही कुणाला भेटायचे, काय कागदपत्रे द्यायची, याबाबत माहिती नसते. त्यामुळे नागरिकांना वाईट अनुभवास सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये पासपोर्टसाठी अद्ययावत सुविधांचा एक वेगळा विभाग उभारण्यात येणार आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांना डार्क ग्रे पॅण्ट, ब्ल्यू शर्ट आणि टाय असा युनिफॉर्म देण्यात येणार आहे.

हायटेक इर्टिगासह गस्त

शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशनसाठी स्वतंत्र पेट्रोलिंगसाठी हायटेक अशा इर्टिगा गाड्या दाखल होणार आहेत. यात एका अधिकाऱ्यासह चार पोलिस फक्त दिवस-रात्र पेट्रोलिंगसाठी काम करणार आहेत. या वाहनामध्ये हत्यारे आणि संकटसमयी महत्त्वाच्या सुविधा असणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज