म. टा. प्रतिनिधी, ठाणे
एनआरसी, सीएए आणि एपीआर कायद्याविरोधात भिवंडीत गुरुवारी एआयएमआयएमचे अध्यक्ष असाउद्दीन ओवेसी यांची सभा होणार होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सभेच्या एक दिवसआधी पोलिसांनी सभा पुढे ढकलण्याची विंनती केली. त्यानंतर ही सभा रद्द करण्यात आली.
भिवंडीतील धोबीतलाव येथील कै. परशुराम टावरे स्टेडियममध्ये गुरुवारी संध्याकाळी ६ ते १० या वेळेत ही सभा आयोजित केली होती. या सभेसाठी एआयएमआयएमचे ओवेसी यांना आमंत्रित करण्यात आले होते. सभेच्या परवानगीबाबत पोलिसांकडे अर्जही केला होता. मात्र, बुधवारी स्थानिक पोलिस ठाण्यातून एआयएमआयएमचे भिवंडी शहराध्यक्षांना पत्र पाठवून जाहीर सभा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती केली होती.