अ‍ॅपशहर

विरार रेल्वेस्थानकात भरदिवसा प्रवाशाची हत्या

पश्चिम रेल्वेमार्गावरील विरार रेल्वेस्थानकात आज माथेफिरू तरुणाने एका प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे रेल्वेस्थानकात खळबळ माजली. पोलिसांनी मारेकरी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

Maharashtra Times 11 Apr 2016, 12:32 pm
मटा ऑनलाइन वृत्त । विरार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम passenger killed at virar railway station
विरार रेल्वेस्थानकात भरदिवसा प्रवाशाची हत्या


पश्चिम रेल्वेमार्गावरील विरार रेल्वेस्थानकात आज माथेफिरू तरुणाने एका प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे रेल्वेस्थानकात खळबळ माजली. पोलिसांनी मारेकरी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

विरार रेल्वेस्थानकात आज सकाळी गर्दीच्या वेळी माथेफिरु तरुणाने एका प्रवाशावर चाकूने सपासप वार केले. यात प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर महेंद्र कुमार पाल याला अटक केली आहे. दरम्यान, मृत प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही. आरोपी महेंद्र कुमार हा मनोरुग्ण असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज