अ‍ॅपशहर

Mumbai Local News: मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार; गर्दीत अश्लील चाळे, पुढे काय झाले...

Mumbai Local Train : ट्रेनमध्ये महिलांना बघून अश्लील चाळे करणाऱ्या एका व्यक्तीला प्रवाशांनी जोरदार चोप दिला. यानंतर त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास दादरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये घडला आहे. गर्दीचा फायदा घेऊन हा व्यक्ती अश्लील चाळे करत होता.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2022, 4:36 pm
ठाणे : लोकल ट्रेनमध्ये एका स्थानकादरम्यान ट्रेनमधील प्रवासी उतरल्यानंतर ट्रेन रिकामी झाली आणि अश्लील चाळे करणाऱ्याला ट्रेनमधल्या प्रवाशांनी पाहिले. हा सर्व प्रकार पाहून प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी त्याला पकडून चोप देण्यास सुरवात केली. यावेळेस काही महिलांनी देखील या व्यक्तीला चोपलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mumbai Local Train News
मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार; गर्दीत अश्लील चाळे, पुढे काय झाले... ( प्रातिनिधिक फोटो )


ट्रेनमध्ये अश्लील चाळे करणारा हा व्यक्ती दारू पिऊन रेल्वेमधून प्रवास करत होता आणि त्या दरम्यान त्याने हे विकृत कृत्य केले आहे. नागरिकांनी चोप दिल्यानंतर हा नराधम माफी मागून गयावया करू लागला. मात्र या नराधमला प्रवाशांनी ठाणे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोकलमधील प्रवाशांनी विकृताला चोप देतानाच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आफताब आलमनुर मोहम्मद अन्सारी असे या विकृत नराधमाचे नाव आहे. दादरहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. ठाण्यातील बाळकुम परिसरात राहणारे एक दाम्पत्य आपल्या ६ वर्षीय मुलगी आणि नातेवाइकासह लोकलने मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ठाण्याच्या दिशेने येण्यासाठी त्यांनी ६ वाजून ३२ मिनिटांची कल्याण ट्रेन पकडली. मात्र या ट्रेनमध्ये त्यांच्यासोबत असे काही घडले की, ते दृश्य पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

या लोकलमध्ये अफताब अन्सारी हा मद्यापी महिलांना बघून अश्लील चाळे करत होता. ही बाब रेल्वेतील काही प्रवाशांनी महिलेच्या लक्षात आणून दिली. हे दृश्य पाहिल्यानंतर महिलेचा राग अनावर झाला आणि तिने त्या नराधमाच्या कानशिलात लगावली आणि आपल्यासोबत असलेल्या पती आणि भावाच्या निदर्शनात ही बाब आणून दिली. त्यानंतर प्रवाशांनी या अफताब अन्सरीला चोप दिला. पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

जीवावरचं शिक्षण! शाळेचे पत्रे तुटलेले, स्लॅबही कोसळला, विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

ठाणे रेल्वे पोलिसांनी या नराधम अफताब अन्सरीच्या विरोधात महिलेच्या तक्रारीवरून कलम ३५४, ३५४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच हा गुन्हा ठाणे पोलिसांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. नराधम अफताब अन्सरीला कुर्ला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुर्ला रेल्वे पोलीस करीत आहेत. ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी ही माहिती दिली.

तुमच्यासाठी ते फक्त जेवण, पिझ्झा, पास्ता, पार्सल असेल, काहींसाठी जीवन मरणाचा प्रश्न; स्वीगी बॉयचा व्हीडिओ व्हा

महत्वाचे लेख